चोपडा सहकारी साखर कारखानाचे चेअरमन अतुल ठाकरे यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

चोपडा सहकारी साखर कारखानाचे चेअरमन अतुल ठाकरे यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
बुट काढण्यावरुन परस्पर तक्रारी दाखल
मंगरुळ ग्रामपंचायतीचा वाद चव्हाट्यावर
अंमळनेर डिवायएसपीकडुन चौकशी
चोपडा प्रतिनिधी – मंगरुळ (ता.चोपडा) येथील ग्रामपंचायतीच्या मासिक मिंटीगला ग्रामपंचायत सदस्य लतीफ सुपडू तडवी बुट घालुन मध्ये आल्याने वादाला तोंड फुटले असुन याप्रकरणी परस्पर विरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी अमळनेर डिवायएसपी यांनी अडावद पोलीस स्टेशनला भेट देत प्रकरणाची चौकशी केली.


याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मंगरुळ ग्रामपंचायत सदस्य लतिफ सुपडु तडवी (वय३४, रा. मंगरुळ) यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, दि.२३ रोजी मी ग्रामपंचायतीच्या मासिक मिटींगला बुट घालुन गेलो असता ग्रामपंचायत सदस्य अतुल ठाकरे यांनी मला बुट बाहेर काढुन यायला अपराधात्मक पध्दतीने बोलले तसेच जातीवाचक शिविगाळ करीत मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच मादरचोद , हलकट जातीचा आम्हाला नियम शिकवतो का ? तुमची लायकी तरी आहे का ? हलकट जातीचे तडवे – भडवे , आदिवासी हो का फादीवासी आमचे तुम्ही काहीही उपाडू शकत नाही , तुमच्याने आमचे काहीएक वाकडे होणार नाही , तू गावात कसा राहतो , तुला बघतो , तुला तुझ्या घरा सकट रॉकेल टाकून पेटवून देऊ अशी धमकी व शिवीगाळ केली असल्याचे म्हटले आहे .अतुल भिमराव ठाकरे व त्यांच्या माणसानंपासून माझ्या जिवितास धोका असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे , सदर प्रकाराबद्दल प्रणय अतुल ठाकरे, छोटु नामदेव पाटील, विलास पाडुरंग धनगर, सौरभ राजेंद्र ठाकरे, पंकज भरत पाटील, विराज अतुल ठाकरे, अतुल भिमराव ठाकरे,
राकेश अभिमन ठाकरे, कांतीलाल गंगाधर पाटील यांच्या विरुध्द भाग ५ गु.रं.नं. १३/२०२१ भादवी कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६, अनुसुचित जमाती अत्याचार अधिनियम कलम ३(१), ३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या तक्रारीत अतुल भिमराव ठाकरे (वय ५२ रा.मंगरुळ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुट काढुन येण्याचे सांगितल्याचा राग आल्याने लतीफ सुपडु तडवी, विवेकानंद पुंडलीक कोळी, राजेंद्र पुंडलीक कोळी, सुपडू बाबू तडवी, सिराज गफूर तडवी रविंद्र श्रीधर निकम, भिकन गंभिर साळुंके, जगदिश भास्कर निकम यांनी ग्रामपंचायत कार्यालयात व बाहेर संगनमत करुन हातात लाठ्या काठ्या घेवुन मला व राजेद्र पाटील, छोटु पाटील, मनोहर पाटील, राकेश ठाकरे, विलास धनगर, शिवाजी साळुंखे, मुबारक तडवी, भिमराज मोरे यांना मारहाण, शिविगाळ करित जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावरुन अडावद पोलीस स्टेशनला भाग ५ गु.रं.नं. १४/२०२१ भादवी कलम १४३, १४७, १४८, ४२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More