चोपडा तालुक्यातील माचले येथील तरुण शेतकऱ्याची रेल्वेखाली जळगाव येथे आत्महत्या

चोपडा तालुक्यातील माचले येथील तरुण शेतकऱ्याची रेल्वेखाली जळगाव येथे आत्महत्या
चोपडा प्रतिनिधी : —– माचले ता चोपडा येथील मुळ रहिवासी व ह.मु जळगाव येथील रहिवासी 38 वर्षीय तरुणाने रात्री नऊ वाजेच्या सुमारास पिंप्राळा भागात रेल्वे खाली आत्महत्या केली आहे . त्यांच्या वर हात ऊसनवारीचे पाच लाख रुपयांचे कर्ज होते व शेतात चार वर्षा पासुन उत्पन येत नव्हते त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले .


याबाबत अधिक माहिती अशी की माचला येथील समाधान यशवंत पाटील वय 38 यांच्या कडे दोन एकर जिरायती शेती आहे , गेल्या चार वर्षा पासून शेतात काहीच उत्पन्न येत नसल्याने त्यांचा वर हात उसनवारीचे पाच लाख रुपयांचे कर्ज होते . शेतात उत्पन येत नसल्यामुळे ते दहा वर्षा पाहुन जळगाव येथे एका खाजगी कॉन्ट्रॅक्टरकडे ड्रायव्हर म्हणून कामाला होते .इकडे खाजगी कर्ज वाले पैशासाठी तगादा लावत होते व पैसे कुठून देणार या चिंतेत समाधान पाटील दहा – पंधरा दिवसापासून टेंशनमध्ये होते . गुरूवार रोजी रात्री नऊ वाजता त्यांनी घरात कोणाला न सांगता घरातून निघून पिंप्राळा भागात रेल्वेखाली आत्महत्या केली ,
त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा , एक मुलगी , भाऊ असा परिवार आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More