चोर सोडून संन्यासाला फाशी ?
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रकार
चोपडा प्रतिनिधी :—-
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दि. 4 मार्च रोजी गहू मोजणी दरम्यान राडा झाला होता , सदर शेतकऱ्याचा गहू व्यापारी राजेंद्र शांतीलाल जैन ( कुशल ट्रेडर्स ) यांनी खरेदी केला होता व सदर गहू मोजणीस व्यापारी , मापाडी व कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रतिनिधी यापैकी एकही प्रतिनिधी उपस्थित नसताना हमाल राजू पाटील ( अरुण नगर ) याने परस्पर गहू मोजणीस सुरवात केली व शेतकऱ्याने खाली बारदानाचे वजन करण्यास सांगितले असता सदर खाली बारदानचे वजन 120 ग्रॅम भरले पण व्यापाऱ्यांनी मला सदर बारदानचे वजन 200 ग्रॅम घ्यायला सांगितले आहे असे हमाल राजू पाटील ( अरुण नगर ) याने शेतकरी प्रल्हाद धनगर ( नरवाडे ) यांना सांगितले .शेतकऱ्याने सदर बाब चुकीचे असल्याचे सांगितले असता हमालाने सदर गहू मोजण्यास नकार दिला व तुम्ही कुठेही तक्रार केली तरी आमचे काहीच होणार नाही असे धमकावले होते .

शेतकरी प्रल्हाद धनगर ( नरवाडे ) यांनी गव्हाचे एक कट्टा दोन वजन काट्यावर मोजून पाहिले असता दोन्ही वजन काट्यात तफावत दिसून आली होती , जवळपास दोन्ही वजन काट्यात जवळपास 300 ते 400 ग्रॅमचा फरक आढळून आल्याने शेतकऱ्याने सदर बाब प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या लक्षात आणून दिली होती .
प्रहार संघटनेचे कार्यकर्ते रविंद्र पाटील व सचिन धनगर हे घटनास्थळी दाखल झाले होते तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कांतीलाल पाटील व उपसभापती नंदकिशोर पाटील यांच्यासह कर्मचारी व व्यापारीसह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित झाले होते व घडलेली घटना चुकीची असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी व कर्मचारी यांनी मान्य करत माल मोजणी करणाऱ्या हमालास शेतकऱ्यांची माफी मागण्यास सांगितले होते व माल खरेदी करणारे व्यापारी राजेंद्र जैन यांना सदर प्रकारा बाबत विचारणा केली असता मी हमालास माल मोजणी करण्यास सांगितले नसल्याचे उत्तरे दिली होती .
त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यावेळी रवींद्र पाटील तालुकाध्यक्ष – प्रहार संघटना , सचिन धनगर ( कोषाध्यक्ष ) ,बाजार समितीचे सभापती कांतीलाल पाटील , उपसभापती नंदकिशोर पाटील , व्यापारी राजेंद्र जैन तसेच शेतकरी मोठ्या संख्येने जमले होते .

सदर घडलेल्या घटनेत हमाल राजू पाटील ( अरुण नगर ) याची कामावरून हकालपट्टी करण्यात आली आहे , म्हणजे सदर प्रकारात चोर सोडून सन्यासाला फाशी ? असा प्रकार झाल्याचे सर्वत्र बोलले जात आहे .
दि 7 मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संचालक मंडळाने पत्रकार परिषद आयोजित करून घडलेला प्रकारात हमालाची चूक होती हे मान्य करत माल मोजतांना मापात पाप अजिबात होत नसल्याचे सांगत संचालक मंडळ नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकरी हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यापुढे असे गैरसमज व गैरप्रकार होणार नाहीत यासाठी काळजी घेतली जाईल व शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी दक्षता घेतली जाईल असे संचालक मंडळातर्फे सांगण्यात आले आहे .
शेतकऱ्यांनी व प्रहार संघटनाने केलेले आरोप चुकीचे आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.












