सौ.मनिषा जीवन चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष, चोपडा यांचा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मान

महिला दिनानिमित्त निसर्ग-मित्र समितीतर्फे धुळ्यात महिला परीषद संपन्न

चोपडा (सचिन जैस्वाल):- विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा केला राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मान महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती, राजमाता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळे व श्री दत्तप्रभू अँग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि.सावेर ता.शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमिताने रविवार दि. ७/३/२०२१ रोजी दुपारी ४ वाजता हॉटेल पाईस स्ट्रीटच्या सभागृहात महिला परिषद संपन्न झाली. या प्रसंगी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांना प्रेरणा म्हणून राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रदुषण नियंत्रण अधिकारी सौ. सौजन्या पाटील, गट शिक्षण अधिकारी सुरेखा देवरे, चोपडा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ.मनिषा जीवन चौधरी, धुळे मनपाचे नगरसेविका सौ.वंदनाताई संजय भामरे, उद्योजिका सौ. मनिषा किशोर डियालाणी, आदी मान्यवर उपस्थित होते.

यांचा झाला राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्काराने सन्मान

१-) सौ.मनिषा जीवन चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष, चोपडा २) डॉ. निशा सुशील महाजन, धुळे ३) सौ.मिना परशुराम देवरे सामाजिक कार्यकर्त्या, बोरीस ४) सौ.वंदना दिलीप पाटील सामाजिक कार्यकर्त्या,पुणे ५) सौ.विजया तानाजी पाटील मुख्याध्यापिका,नाशिक ६) सौ.सिमा आत्माराम देसले पिंपळनेर ता-साक्री जि धुळे ७) सौ.साधना सुधीर पाटील सामाजिक कार्यकर्त्या मनमाड ८) सौ.पुष्पा शंकरराव मतकर अध्यक्ष, लायनेस क्लब, मनमाड ९)सौ सुनिता विलासराव माळी, आदर्श शेतकरी, गोंदूर धुळे १०) कु. दिव्या यशवंत पाटील (भोसले) अमळदे, भडगाव ११)सौ. मनिषा किशोर डियालाणी, उद्योजिका, धुळे १२) वैशाली रोहीदास झाल्टे, जळगाव १३) सपना रामकृपाल श्रीवास्तव, जळगाव १४) वैशाली शिवाजी अहिरे, वायगाव

सदर महिला परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी निसर्ग-मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, धुळे जिल्हा अध्यक्ष डी.बी.पाटील व राज्य महासचिव संतोषराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा.एच.ए.पाटील, उपाध्यक्ष आर.आर.सोनवणे, सचिव मनोज पाटील, सहसचिव राकेश जाधव, संपर्क प्रमुख शाहिर विजय वाघ, कांतिलाल देवरे, वैभव पाटील, हर्षल महाजन, निसर्ग अहिरे, (कु.वनश्री अहिरे व कु. बोरसे,) आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श महिला अर्चना सोनवणे, सुत्रसंंचालन सौ.उषा दयाराम पाटील, तर आभार प्रदर्शन डॉ मेघा हिंमतराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजमाता जिजाऊ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय अण्णा भामरे, दत्तप्रभू अँग्रो इंडस्ट्रीज चे चेअरमन दिपक काशिनाध पाटील, पाईस स्ट्रीट हॉटेलचे मालक तथा जेष्ट सामाजिक कार्यकर्ते योगीराज मराठे, जेष्ट सामाजिक कार्यकर्ते परशुराम देवरे यांचे विशेष योगदान लाभले तर चोपडा नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष जीवन भाऊ चौधरी, उद्योजक-पक्षी मित्र किशोर डियालाणी, उद्यानपंडित वनश्री पुरस्कारप्राप्त विलास माळी, निसर्गमित्र समितीचे जिल्हा सचिव विश्वासराव पगार, जिल्हा प्रवक्ता डॉ.प्रविणसिंग गिरासे, धुळे शहर उपाध्यक्ष राजेंद्र खैरनार, नांदगाव तालुकाध्यक्ष प्रा.समाधन चौधरी, गोकुळ त्र्यंबक पाटील, सुधीर सनेर, सुकलाल बोरसे, प्रा.भामरे तसेच आमंत्रित महिला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More