चोपड्यात इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

चोपड्यात इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग; लाखोंचे नुकसान
चोपडा ( प्रतिनिधी ) — शहरातील गुरव गल्लीतील न्यू लक्ष्मी मोबाईल & इलेक्ट्रॉनिक शॉपीला सकाळी ९ वाजेच्या सुमारास अचानक आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. सकाळी ९ वाजे दरम्यान अचानक लागलेल्या आगीत दुकानातील विविध कंपनीचे मोबाईल, टीव्ही, एलडी, मोबाईलचे स्पेअर पार्ट,घड्याळ अश्या विविध वस्तू आगीत खाक झाल्या


सकाळी – सकाळी आग लागल्या मुळे परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले तसेच वेळीच चोपडा नगरपरिषदचे अग्निशमन बंब आल्याने आजूबाजूला आग कुठेही न पसरता ती एकच दुकान खाक झाली यावेळी दुकानाचे मालक युनूस सलीम रंगरेंज याला नुकसानी बाबत विचारले असता त्यांनी सांगितले की २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले असेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यावेळी अशपाक पठाण, नदीम शेख, लखन गुरव, भूषण साळुंखे, सनी नगराळे, अजिम खान, शेख सय्यद, राजू सय्यद, प्रकाश काविरे, लक्ष्मण काविरे आदी शेकडो लोकांनीं आग विझविण्यासाठी मदत केली. चोपडा शहर पोलिस स्टेशनचे संतोष पारधी सह तीन पोलीस कर्मचारीनी देखील मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More