चोपडा शहरास हगणदारी मुक्त शहरांच्या मानांकनात ODF++ (Open Defication free++) हे मानांकन दर्जा प्राप्त

चोपडा (प्रतिनिधी)
स्वच्छ भारत अभियानातील एक महत्वाचे उपांग म्हणजे हगणदारी मुक्त शहर होय. या अंतर्गत हगणदारी मुक्त होणे, त्यात सातत्य टिकवणे व प्रत्येक कुटूंबास शौचालय सुविधा उपलब्ध करुन देणे, तसेच शौचालयातील मैल्याचे सुयोग्य व्यवस्थापन व त्यावर प्रक्रिया करणे अभिप्रेत आहे. या अंतर्गत निकषांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने निकष निहाय शहरांना हगणदारी मुक्त शहर-ODF, त्यात सातत्य टिकवणे-ODF+, उक्त नमूद सर्व निकषांची पूर्तता झाल्यास-ODF++ दर्जा बहाल करणेत येत असतो. त्याअनुषंगाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केंद्र सरकार नियुक्त IQVIA या त्रयस्थ यंत्रणेमार्फत दि.25-26 फेब्रुवारी 2021 रोजी चोपडा शहरात तपासणी करणेत आली. यामध्ये शहरातील प्रभाग निहाय सार्वजनिक शौचालय, मुताऱ्या, मैला व्यवस्थापन प्रकल्प यांची तपासणी करणेत आली. या पार्श्वभूमीवर सदर परिक्षणाचा नूकताच निकाल जाहीर झाला असून यात चोपडा शहरास हगणदारी मुक्त शहरांच्या मानांकनात ODF++ (Open Defication free++) हे मानांकन/दर्जा प्राप्त झालेला आहे.

सन 2019-20 मध्ये झालेल्या परिक्षणामध्ये चोपडा शहरास हगणदारी मुक्त शहरांच्या मानांकनात ODF+ (Open Defication free+) हे मानांकन प्राप्त झालेले होते . चोपडा नगरपरिषदेने 14 वा वित्त आयोग निधितून फिरते शौचालय, व्हॅक्युम एमटीअर मशिन, मैला व्यवस्थापन प्रकल्प, शहरातील संकलीत कचर्यावर प्रक्रिया करणेकामी स्क्रिनिंग मशिन, प्लास्टीक बेलिंग मशिन, सिंगल शाफ्ट श्रेडर मशिन, जे.सी.बी. मशिन, ओला व सुका कचरा विलगीकृतरित्या संकलन करणेकामी घंटा गाडी खरेदी इ. सार्वजनिक स्वच्छतेसंदर्भातील पुरक कामे उत्कृष्टपणे केली आहेत तसेच सूक्ष्मनियोजन करुन घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत द्वारस्तर कचरा संकलन, उगमस्थानीच कचरा विलगीकरण, रहिवासी क्षेत्र व वाणिज्य क्षेत्र तसेच रस्त्यांची दैनंदिन साफसफाई व संकलित कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणे इ. कामामुळे चोपडा शहरातील सार्वजनिक स्वच्छता, मैला व्यवस्थापन, कचरा संकलन वाहतूक व प्रक्रिया इ. करीता क्षमता बांधणीस मदत झाली. सदर कामगिरीमध्ये चोपडा शहरातील नागरिकांचा सक्रिय सहभाग असून त्यांचे देखील यात महत्वाचे योगदान आहे. तसेच चोपडा नगर परिषदेचे समस्त कर्मचारी,अधिकारी, विभागप्रमुख व पदाधिकारी यांचे यात बहुमूल्य असे योगदान आहे. शहरातील जागरुक नागरिकांच्या मदतीनेच कचरामुक्त चोपडा शहराचे ध्येय साध्य होईल, या आत्मविश्वासाने चोपडा नगरपरिषदेने मिशन स्वच्छ सर्वेक्षण-2021 हाती घेतले असून मागील वर्षी प्रमाणेच यावर्षीही चोपडा शहरातील तमाम नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ व सुंदर चोपडा शहराचे स्वप्न साकार होईल. तसेच कोरोना मुक्तीचे प्रयत्न यशस्वी होतील.


चोपडा नगरपरिषदेच्या या यशाबद्दल सर्व कर्मचारी, अधिकारी ,सर्व सन्मा.सदस्य व समस्त नागरिक यांचे नगराध्यक्षा सौ.मनिषा चौधरी, मुख्याधिकारी श्री अविनाश गांगोडे व उपनगराध्यक्ष श्री भूपेंद्र गुजराथी, सार्व.स्वच्छता समिती सभापती सौ.सुप्रिया सनेर, चोपडा विकास मंच गटनेते श्री जिवन चौधरी, शिवसेना गटनेते श्री महेश पवार, यांनी हार्दिक अभिनंदन करत त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.या तपासनीकामी स्वच्छता निरीक्षक विकास पाटील, स्वच्छता पर्यवेक्षक प्रवीण मराठे,सर्व स्वच्छता मुकादम व सर्व स्वच्छता कर्मचारी आणि स्वच्छ सर्वेक्षण शहर समन्वयक राकेश वैष्णव यांनी विशेष परिश्रम घेतले… त्यांचेही सर्वांनी मनपूर्वक अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More