चोपडा – सद्या कोरोना महामारीमुळे संपुर्ण चोपडा तालुका हादरुन गेला आहे.त्यातच कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढुन त्यामधे कित्येक निष्पापांचा बळी जातोय.याला कुठेतरी आळा बसण्याकरीता जास्तीत जास्त अँटीजेन रॕपिड चाचणी करुन लवकर निदान व्हावे त्यामुळे रुग्णांचा जीव वाचावा व कोरोनाची साखळी तुटावी या भावनेतुन चोपडा नगरपालिकेमार्फत मुख्याधिकारी अविनाश गांगोडे व वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आरोग्य कर्मचार्यांमार्फत शहरात ठिकठिकाणी चाचणी शिबीर

घेण्यात येत आहे.
त्याकरीता दि.20/03/2020 रोजी सहयोग कॉलनी परिसरात कोविड19 चाचणीकरीता अँटिजेन रॕपिड टेस्ट कँप घेण्यात आला.यामधे एकुण 100 रहिवाश्यांच्या रॕपिड टेस्ट घेण्यात आल्या.त्यामधे एकुण 17 रहिवाश्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.त्यांनंतर त्यांना लगेच उपजिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचाराकरीता पाठविण्यात आले.या शिबीरामधे आरोग्यसेविका सुनिता पावरा,रंजना निकुंभ,सविता नाथबुवा तसेच आशा स्वयंमसेविका भारती शिंपी,पुनम सोनवणे व सविता ओली आदिनी आपली जवाबदारी चोख बजावली.
तसेच महिला मंडळ मुख्याध्यापक सुनिल चौधरी,निवृत्त मुख्याध्यापक कोतवाल,दै.देशोन्नतीचे प्रतिनिधी संजय बारी,दै.साईमत चे पत्रकार संदिप ओली,समाधान शिरसाठ,सनी मोरे,विनोद जगदाळे आदिंसह साईबाबा कॉलनी,सहयोग कॉलनी व सिद्धिविनायक कॉलनी परिसरातील सर्व नागरिकांनी सहकार्य केले.












