गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर आरोपांची चौकशी व्हावी व तो पर्यंत त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा त्यासाठी चोपडा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन …

चोपडा( प्रतिनिधी)आज भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका महाराष्ट्र राज्या चे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर आरोपांची चौकशी व्हावी व तो पर्यंत त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा त्यासाठी मा.तसिलदार अनिल गावित चोपडा व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचीन वाझे यांना दर महिन्याला100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिलें होतें असे विधान मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंघ यांनी मा .महोदय मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे केले आहे

म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा देवून नैतिकता जोपासावी व ह्या प्रकारांची. सखोल चौकशी व्हावी आम्ही भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका ह्या आंदोलन मार्फत जाहीर निषेध व्यक्त करतो
यावेळेस निवेदन देण्यासाठी भाजप नेते प्रदिप पाटील तालुकाध्यक्ष पंकज पाटील युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील संपर्क प्रमुख विजय बाविस्कर अनुसूचित जमाती प्रदेश सदस्य पिटु पावरा व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More