E-Pos मशीनवर नॉमिनीचे अंगठे घेऊन धान्य वाटप करण्याची परवानगी द्यावी
स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची मागणी
चोपडा प्रतिनिधी :—–सचिन जैस्वाल
Covid-19 विषाणूचा संसर्ग मागील 22 मार्च 2019 पासून सुरू झाला असून तद्नंतर काही महिन्यात संसर्ग कमी झाल्याने रास्त भाव दुकानदार यांनी शासनाच्या धोरणाप्रमाणे E-Pos मशीन द्वारे धान्याचे वाटप आज पर्यंत केलेले आहे परंतु पुन्हा चोपडा तालुक्यात या विषाणूचा संसर्ग जोरात सुरू झाला असून प्रत्येक गावात covid-19 चा प्रादुर्भाव अतिशय तीव्र प्रमाणात वाढलेला असून नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे .चोपडा तालुक्यात 19 मार्च 2021 पासून दिनांक 24 मार्च 2021 या कालावधीसाठी नागरिकांचे व्यवहार मुक्तपणे संचार यावर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत . तालुक्यातील covid-19 ची परिस्थिती पाहता पुढील काळातही सदरचे निर्बंध कायम सुरू राहणार असल्याचे दिसून येत आहे तरी अशा परिस्थितीत गावागावांमध्ये लॉकडाऊन सुरू झालेले असल्याने E-Pos मशीन द्वारे लाभार्थींचे अंगठे घेऊन धान्याचे वाटप करणे शक्य होणार नसल्याचे व लाभार्थी देखील भीतीपोटी स्वतः E-Pos मशीन वर अंगठे देण्यास स्वयंस्फूर्तीने तयार होत नाहीत परिणामी धान्य वाटपाची टक्केवारीत वाढ होत नाही व धान्य वाटप करण्यास अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहेत.

गावातील लाभार्थी देखील अंगठे देण्यास तयार होत नाही व ऑफलाइन पद्धतीने धान्य वाटप करा अशी मागणी करीत असतात तसे नाही केले तर रास्त भाव दुकानदारांशी लाभार्थी गावोगावी हुज्जत व भांडण करत आहेत तरी covid-19 चा संसर्ग पाहता मागील वर्षी बरेच रास्त भाव दुकानदार यांना व त्यांच्या सहकार्यांना कोरोनाविषाणू ने ग्रासले होते रास्त भाव दुकानदार यांना कोराना विषाणू पासून संरक्षण म्हणून विमा देखील मंजूर करावा व त्याप्रमाणे शासनामार्फत लवकरच कोरानाची लस देखील रास्त भाव दुकानदारांना देखील उपलब्ध करून द्यावी आणि लाभार्थी मशीनवर अंगठे देऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून रास्त भाव दुकानदार यांचे स्वतः किंवा नॉमिनी च्या द्वारे धान्य वाटप करण्यास परवानगी द्यावी अशा आशयाचे निवेदन तालुक्याचे तहसीलदार यांना देण्यात आले आहे . निवेदनावर विकास काशिनाथ पाटील तालुकाध्यक्ष ,अशोक तिलोकचंद जैन ,तालुका उपाध्यक्ष , बाळू गणपत पाटील , सावित्रीबाई फुले महिला बचत गट आडावद ,महर्षी वाल्मिक महिला बचत गट अडावद ,जय योगेश्वर महिला बचत गट अडावद , मिनाबाई शशिकांत पाटील खाचणे ,सुनिता श्याम सोनार ,मोहन कोष्टी , बाबुराव बुटा पावरा ,संजय रामसिंग पाटील , भरत रामसिंग पाटील,पुनमचंद जगदेव भावसार , चंद्रकांत दत्तात्रय नेवे , रशिद अन्वर तडवी, सावित्रीबाई फुले महिला बचत गट ,जुवेदाबी शब्बीर खाटीक ,सुमित्राबाई अरुण शिरसाट ,अशोक शामराव चौधरी , आर के अग्रवाल ,चेअरमन शेतकी संघ चोपडा ,शैलेश चंपालाल जैन , प्रवीण चंपालाल जैन , अशोक जैन, अनिल लिलाधर कोळी ,रजिया बाई सरफराज तडवी ,वैष्णवी महिला बचत गट , नबाब दिलदार तडवी ,एम जी जैन, जयवंत गणेश दुबे ,भीमसिंग जयराम पावरा, मेहरबान मुशीर तडवी, अशोक राजाराम बाविस्कर, जे आर जैन ,के डी जैन , यू अर जैन विलास गोकुळदास जैन, मुन्नीबाई बबन जैन , नरेंद्र मोतीलाल जैन , आर आर चौधरी इत्यादींचा निवेदनावर स्वाक्षर्या आहेत ….












