चोपडा तालुक्यात सिटीस्कॅनची अपुरी सुविधारुग्णांचे होत आहेत अतोनात हालसिटीस्कॅनसाठी आता द्यावे लागणार फक्त दोन हजार रुपये

चोपडा तालुक्यात सिटीस्कॅनची अपुरी सुविधा
रुग्णांचे होत आहेत अतोनात हाल
सिटीस्कॅनसाठी आता द्यावे लागणार फक्त दोन हजार रुपये

चोपडा प्रतिनिधी :—
चोपडा तालुक्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातला असून दररोज सुमारे 300 नव्या रुग्णांची भर पडत आहे व सद्यस्थितीत दोन हजार रुग्ण ऍक्टिव्ह आहेत अशा परिस्थितीत चोपडा तालुक्यात रुग्णांना सिटीस्कॅनची सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे . सिटीस्कॅन करण्यासाठी तब्बल तीन ते चार दिवस वेटिंग करावी लागत आहे तसेच चोपडा तालुक्यातील कोरोनाची वाढती संख्या पाहता तालुक्यात फक्त 3 सिटीस्कॅन केंद्र असल्याची माहिती मिळत आहे , त्यात समर्थ सिटीस्कॅन , नृसिंह हॉस्पिटल व हरताळकर हॉस्पिटल या तीनच ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे .अजून सिटीस्कॅन केंद्रे असावीत अशी मागणी होत आहे .


सध्या चोपडा तालुक्याची कोरोनाची स्थिती अतिशय बिकट स्वरूपाची असून देखील सदर सेंटर सकाळी उशिरा सुरू होतात व संध्याकाळी लवकर बंद होतात अशा स्वरूपाच्या तक्रारी वाढत आहेत तरी पूर्णवेळ सेवा द्यावी व रुग्णांना वेठीस धरू नये अशी मागणी होत आहे .
शासकीय दरापेक्षा अव्वाच्या सव्वा रक्कम घेत असल्याच्या तक्रारी देखील वाढत आहेत . या बाबतीत प्रांताधिकारी सुमित शिंदे , तालुक्याचे तहसीलदार अनिल गावीत , मुख्याधिकारी अविनाश गांगोडे , नायब तहसिलदार राजेश पउळ , नायब तहसिलदार महेश साळुंखे यांच्या उपस्थितीत व पत्रकारांच्या बैठकीत यापुढे चोपडा तालुक्यातील जनतेने सिटीस्कॅन साठी फक्त दोन हजार रुपये द्यावेत व रेमडीसीवर साठी रुपये1200 द्यावेत असे ठरले असून जर कोणी हॉस्पिटल , मेडिकल स्टोअर्स किंवा डॉक्टर्स अधिकची रक्कम मागणी करत असेल तर तक्रार द्यावी आम्ही सदर व्यक्ती किंवा आस्थापनावर कायदेशीर गुन्हा नोंदवू असे प्रांताधिकारी सुमित शिंदे व तहसीलदार अनिल गावीत यांनी उपस्थित पत्रकारांशी बोलताना सांगितले . कोविडच्या नावाखाली सर्वसामान्य रुग्णांची लूट जर होत असेल तर सदर बाब चुकीचे असल्याचे सांगितले . अशा रुग्णालयांवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येईल असेही सांगितले , विशेष म्हणजे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सार्वजनिकरित्या जाहीर केल्यावर खाजगी रुग्णालये हे रुग्णांकडून एक ते तीन लाखापर्यंतची ऍडव्हान्स रक्कम मागतात व हे पैसे जमा करू शकतं नसणाऱ्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत , परिणामी रुग्णाला आपला जीव गमवावा लागतो अश्या ऍडव्हान्स रक्कम मागणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे .
तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर मागील वर्षांपासून सातत्याने नियमित कोविड 19 ची दररोजची आकडेवारी न चुकता पत्रकारांना देत होते , पण दि 23 मार्च रोजी त्यांनी कोविडची आकडेवारी दिली नाही त्या संदर्भात तहसीलदार अनिल गावीत यांना विचारले असता , आर्टिपीसीआर ची राहिलेली आकडेवारी एकदाच आल्याने थोड्या अडचणी आल्यामुळे काल कोविडची आकडेवारी आम्ही देऊ शकलो नाहीत तरी आज पासून रेग्युलर मिळेल असे सांगितले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More