चोपडा शहर पोलीस स्टेशनला परस्परविरोधात गुन्हे दाखल

चोपडा ( प्रतिनिधी) शहरातील पाटील गडी भागातील ४५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारी नुसार ती महिला तिच्याच पडक्या घराची साफ सफाई कामासाठी गेली असता या गोष्टीचा राग आल्याने त्या ठिकाणी येऊन अशोक मोतीराम पवार याने सदरील महिलेचा विनयभंग केला.सदरील महिलेची नणंद सोडविण्यासाठी गेली असता आरोपी शिवराम पवार याने तिला देखील मारहाण केली.तसेच फिर्यादी महिलेने पती व दिर यांना फोवरून घटनेची माहिती दिली व त्यांना बोलवून घेतले.पती व दिर आरोपींना समजावण्यासाठी गेले असता महेश पवार व दीपक पवार याने त्यांना देखील लोखंडी सळई ने मारहाण केली. पवार , दीपक पवार यांच्याकडे पडक्या घराची साफसफाई करण्यासाठी आली असता .सदरील महिलेने दिलेल्या फिर्यादनुसार अशोक पवार ,शिवराम पवार,महेश पवार ,दीपक पवार या आरोपींवर भाग ५गु र न १३७/१९ भा द वि क ३५४,३२४,३२३,५०४,५०६,,३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गद्शनाखाली पो हे कॉ रत्नमाला शिरसाठ हया करत आहे.
दुसऱ्या फिर्यादीनुसार मीनाबाई नाना पवार वय ३५रा पाटील गढी चोपडा या महिलेने दिलेल्या फिर्यादी नुसार राजेंद्र पवार ,किसन पवार, शाम पवार,दिनेश पवार सर्व रा पाटील गढी चोपडा यांनी तुमचे डुकरे चोरून नेऊ अशी धमकी दिली. मिनाबाई पवार त्यांना समजा न्यासाठी गेल्या असता या गोष्टीचा राग येऊन दि २५रोजी बुधवारी संध्यकाळी पाच वाजता मारहाण करून शिवीगाळ केली. मिनाबाई पवार यांनी दिलेल्या फिर्यादनुसार राजेंद्र पवार ,किसन पवार, शाम पवार,दिनेश पवार सर्व रा पाटील गढी चोपडा यांच्यावर चोपडा शहर पोलिस ठाण्यात भाग क्र ५गु र न १३८/१९ भा द वि कलम ३२४,५०४,५०६,४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आहे.पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गद्शनाखाली पो हे कॉ श्री शिरसाठ करित आहेत….












