दोन जिवलग मित्रांचा कोरोनाने घेतला बळी
चोपडा तालुक्यात नऊ शिक्षकांचा मृत्यू तर 200 हून अधिक शिक्षक कोरोना बाधित चोपडा

दोन जिवलग मित्रांचा कोरोनाने घेतला बळी
चोपडा तालुक्यात नऊ शिक्षकांचा मृत्यू तर 200 हून अधिक शिक्षक कोरोना बाधित चोपडा प्रतिनिधी :—–
येथील धनवाडी रस्त्यालगत असलेल्या कॉलनी मध्ये दोन जिवलग मित्र राहत होते .एका मित्राला कोरोनाची लागण झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करणाऱ्या मित्राचाही कोरोनाने बळी घेतल्याची दुर्दैवी घटना चोपडा तालुक्यात घडली आहे .


चोपडा शहरासह तालुक्यात कोरोनाने अक्षरशः कहर माजविला आहे . चुंचाळे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक त्रिशूल सदाशिव पाटील व अनवर्डे बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दीपक रामदास वराडे हे दोघे खूप जिवलग मित्र होते .चुंचाळे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक त्रिशूल सदाशिव पाटील यांना सर्वप्रथम कोरोनाची लागण झाली होती ते उपचारासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते पण तब्येतीत सुधारणा होत नसल्याने नातेवाईक व मित्रमंडळींनी पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्याचा निर्णय घेतला .अनवर्डे बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दीपक रामदास वराडे आपल्या मित्रास म्हणजे त्रिशूल सदाशिव पाटील यांना वाहनातून उपचारासाठी जळगाव येथे घेऊन गेले होते त्यानंतर दीपक वराडे यांना देखील कोरोना ची लागण झाली .


जळगाव येथे उपचारादरम्यान २५ मार्च रोजी त्रिशूल सदाशिव पाटील (वय ३८) यांच्या मृत्यू झाला तर गुरुवारी १ एप्रिल रोजी मित्राच्या मदतीला धावणारा जिवलग मित्र दीपक वराडे यांच्या देखील नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण चोपडा तालुक्‍यात हळहळ व्यक्त होत आहे .
चोपडा तालुक्यात आतापर्यंत नऊ शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सुमारे 200 च्या वर शिक्षक कोरोनामुळे बाधित झाले आहेत .त्यातच शासनाने पुन्हा माझे कुटुंब – माझी जबाबदारी अंतर्गत शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत .त्यामुळे शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे व शिक्षक व शिक्षक संघटनांमार्फत वर्क फ्रॉम होम ची मागणी होत आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More