बीटी बियाणे चा दरवाढीला शेतकरी संघटनेचा विरोध

चोपडा (प्रतिनिधी)वरून आस्मानी संकट व खाली बीटी बियाणां वाल्या कंपन्यांचा सुलतानी संकट बीटी बियाण्यामध्ये कोणतीही सुधारणा होत नसतांना दरवाढ

बीटी बियाणे मध्ये काहीही सुधारणा नसताना दरवाढ करण्यात आली आहे. हे एक प्रकारे शेतकऱ्यांची लूट करण्यासाठी सरकारने उचलले पाऊल .ज्या वेडेस बीटी बियाणे आले तेव्हा दोन वर्षापर्यंत शेतकऱ्यांना बीटी बियाणे पासून चांगले उत्पन्न निघत होते मात्र 2017 पासून बीटी बियाण्यावर गुलाबी बोंड आळी चे प्रमाण खूपच वाढले आहे जेवढे शेतकऱ्यांना उत्पन्न येत नाही त्यापेक्षा जास्त खर्च बीटी कापसावर होत आहे.


पहिल्यादा ज्यावेळेस साधे कापूस बियाणे होते त्यावेडेस त्याच्यावर जेवढा खर्च होता एवढा खर्च आज बिटी कापसावर होत आहे सरकारला जर कापसाचा बीटी बियान्याचे दर वाढवायचे आहेत तर त्यांनी शेतकऱ्यांना नव नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे तरच शेतकरी नवीन बीटी बियाणे लागवड करेल 730/- रुपयाला मिळणारा पॅकेट आज 765/- रुपये रेट करण्यात आला आहे 35 रुपये चा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येत आहे .
बाजारात बऱ्याच कंपन्यां बिजी 3, बीजी 4 च्या नावाने बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांना फसविण्याचे काम करत आहेत त्या मुळे शेतकऱ्यांची फसवणूक करून पैसे कमावण्याच्या गोरख धंदा बियाणे कंपन्या करत आहे यांच्या तपास कृषी विभागाने कसोशीने लावा .
केंद्र सरकारने बीजी 1 , बीजी 2 बियाण्याच्या दरात पाच टक्के वाढ केली आहे ती त्वरित मागे घ्यावी मागणी शेतकरी संघटनेचे
माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील,
उपजिल्हाध्यक्ष किरण गुर्जर,
जिल्हाध्यक्ष संजय महाजन, सचिन सोनवणे चोपडा, खुशाल सोनवणे एरंडोल, अखिलेश पाटील भडगाव, मंगेश राजपूत अमळनेर, जीवन चौधरी यावल, नामदेव महाजन पाचोरा, विनोद धनगर चोपडा, प्रभाकर शिंदे वर्डी, रवींद्र पाटील प्रहार संघटना, सचिन धनगर प्रहार संघटना, यांच्यासह हजारो शेतकऱ्यांची मागणी आहे.


बीटी बियाण्याच्या पाच टक्के केलेली दरवाढ त्वरित मागे घ्या अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचं पावित्र्यात आहे आहे.

केंद्र सरकारने बिजी बियाण्यात सुधारणा करून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान विकसित करून द्यावे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बिजी 3, बिजी 4 तंत्रज्ञान द्यावे मग प्रत्येक शेतकरी राजीखुशीने 765 रूपयांना बिजी बियाण्ये घेईल आज मात्र जो बीजी 2 बियाण्याच्या दरात पाच टक्के वाढ झाली आहे ती चुकीची आहे ज्या बिजी 2 मुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्याच बियाण्याच्या दरात वाढ करून शेतकऱ्यांना मारक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More