जिल्ह्यातील 11 विधानसभा क्षेत्रासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी 198 नामनिर्देशनपत्र वितरीत

जळगाव, दि. 27, ( प्रतिनिधी ) : – जिल्ह्यातील 11 विधानसभा क्षेत्रासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी 198 नामनिर्देशनपत्र वितरीत झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणूकीसाठी आजपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात 11 विधानसभा क्षेत्र असून यामध्ये आज पहिल्याच दिवशी सर्वाधिक 67 नामनिर्देशनपत्र जळगाव शहर मतदार संघात तर सर्वाधिक कमी 2 अंमळनेर मतदार संघात वितरीत झाले आहे.
विधानसभा क्षेत्रनिहाय वाटप झालेले नामनिर्देशन पत्र- चोपडा-21, रावेर-13, भुसावळ-24, जळगाव शहर-67, जळगाव ग्रामीण-27, अमळनेर-2, एरंडोल-7, चाळीसगाव-18, पाचोरा-6, जामनेर-8, मुक्ताईनगर-5 असे एकूण 198 नामनिर्देशनपत्र वितरीत झाले असल्याची माहिती सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More