इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे तयार करावे लागणार निकाल
शिक्षकांना ठेवावे लागणार रेकॉर्ड
शिक्षक संचालकांनी दिल्या नवीन गाईडलाईन
चोपडा प्रतिनिधी :—–
कोविड १९ या अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष 2020 – 21 मध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क अधिनियम 2009 नुसार वर्गन्नती देण्या संदर्भात मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेचे संचालक दिनकर टेमकर यांनी आठ एप्रिल रोजी परिपत्रकाद्वारे शिक्षक व शाळा पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे .

कोविड १९ च्या अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष 2020 – 21 मध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करता आल्या नाहीत , त्यामुळे इयत्ता पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळा व गुरुजींचे दर्शन सुद्धा झाले नाही तसेच इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळांमध्ये कमी कालावधीकरिता प्रत्यक्ष वर्गात अध्यापन काही काळ शक्य झाले . शाळा बंद पण विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून शासन व शाळा स्तरावरून विविध स्वरूपाचे प्रयत्न केले गेले आहेत व ते अद्याप देखील सुरू आहेत .
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने दीक्षा ॲप आधारित शाळा बंद ….पण शिक्षण सुरू ! या अभ्यासमालेच्या सहाय्याने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दररोज एका विषयाच्या घटक देऊन विद्यार्थ्यांचे शिकणे सुरू राहावे म्हणून प्रयत्न केले गेले तसेच शैक्षणिक दिनदर्शिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयम्अध्ययनासाठीचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले , याचसोबत गली गली सिम सिम , टीलिमिली , ज्ञानगंगा अशा शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण दूरदर्शनच्या डी डी सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात आले . इयत्ता निहाय युट्युब ,जिओ टीव्ही च्या माध्यमातून शिक्षण सुरूच आहे. राज्यातील शिक्षकांनी या परिस्थितीत देखील ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात वाड्या-वस्त्यांवर , तांड्यावर प्रत्यक्ष जाऊन विविध उपक्रमांद्वारे शिक्षण सुरू ठेवण्याच्या प्रयत्न सुरू ठेवला आहे .

शासनाने शैक्षणिक वर्ष 2020 – 21 मधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 कलम 16 अन्वये वर्गन्नती देण्यात आली आहे .
************************************
शिक्षकांनी करावयाच्या कृती
ज्या विद्यार्थ्यांची आकारिक व संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली असेल अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय क्रमांक पी आर ई / 2010 /(136 /10 ) 20 ऑगस्ट 2010 च्या जीआर नुसार पदोन्नती द्यावी . # ज्या विद्यार्थ्यांचे फक्त आकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली असेल अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनातील विद्यार्थ्यांची संपादणूक लक्षात घेता त्याचे रूपांतर शंभर गुणांमध्ये करावे व त्यानुसार विद्यार्थ्यांची श्रेणी निर्धारित करावी .
ज्या विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करणे शक्य झाले नसेल त्यांनी शासन पत्र दिनांक सहा एप्रिल 2021 नुसार बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कलम 16 नुसार वर कोणती द्यावी अशा विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रकावर आरती ऍड 2009 कलम 16 नुसार वर्गन्नती द्यावी .अशा विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकावर आरटीई ऍक्ट 2009 कलम 16 नुसार वर्गन्नती असा शेरा नमूद करावा . याव्यतिरिक्त कोणताही शेरा नमूद करण्यात येऊ नये .
विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक , संचयी नोंदपत्रक इत्यादी अभिलेखे नियमित वेळेत पूर्ण करून स्थानिक परिस्थितीनुसार वितरित करावेत ..
शब्दांकन
आर डी पाटील ( पत्रकार तथा उपशिक्षक पंकज विद्यालय चोपडा )
9860519006 ; 8999671658












