कोरोनाचा पार्श्वभूमीवर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साधेपणाने घरात राहूनच साजरा करा

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साधेपणाने घरात राहूनच साजरा करा
चोपडा
थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने व रक्तदान शिबिर आयोजित करून साजरी करावी.

असे श्री संत सावता माळी युवक संघ तर्फे करण्यात आले आहे. संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य दरवर्षी प्रमाणे यंदाही ११ एप्रिल रोजी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले व १४ एप्रिल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवळ आलेली असुन पुन्हा जगभरासह आपल्या महाराष्ट्रातही कोरोना या विषाणुने मोठे थैमान घातले आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सामाजीक अंतर पाळणे मास्क लावणे हे कटाक्षाने पाळणे गरजेचे आहे. परंतु मागील काही दिवसात ज्या प्रकारे रुग्ण संख्या वाढली आहे त्या पार्श्वभुमीवर सर्वांनी महात्मा फुले जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने घरी साजरी करून या दोन्ही महापुरुषांच्या जयंती निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात महारक्तदान शिबिर सर्व राजकीय पक्ष, सेवा भावी संस्था, विविध संघटना व इतर सर्वांनी एकत्र येऊन घेऊन एक वेगळा आदर्श निर्माण करावा. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा व क्रांतीज्योती सावित्रीफुले यांनी स्त्री शिक्षणाबरोबर सामाजीक
आरोग्यालाही अनन्य साधारण महत्व आपल्या कार्यातुन दिलेले आहे. तत्कालीन परिस्थितीत पुण्यात प्लेगच्या साथीने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलेले असताना, प्रसंगी जिवीताचाही विचार न करता नागरीकांचे जीव वाचावे यासाठी
फुले कुटुंबीयांचा त्याग व समर्पण हे आजच्या कोरोना महामारीशी लढण्यासाठी आपण सर्वांनी आदर्श व प्रेरणादायी मानावे.

ज्या महापुरुषांनी आपल्यावर समाजरक्षणाचे संस्कार घालुन दिलेले आहेत, त्याचमहापुरुषांच्या जयंती दिनी त्यांचे विचार आदर्श माणुन कुठेही गर्दी न करता शासनाचे नियम न मोडता महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरात राहुन आपल्या कुटुंबीयांसमवेत साधे पणाणे साजरी करावी. व संपुर्ण महाराष्ट्रात महरक्तदान शिबिराचे आयोजन करावे. श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड , प्रदेश अध्यक्ष जितेंद्र महाजन खान्देश विभागीय अध्यक्ष संजय महाजन खान्देश विभागीय उपाध्यक्ष लक्ष्मण महाजन खान्देश विभागीय संपर्कप्रमुख समाधान माळी जळगाव जिल्हाध्यक्ष महेंद्र महाजन जिल्हा उपाध्यक्ष कल्पेश महाजन आणि समाधान माळी जिल्हा सर्व जिल्हा पदाधिकारी यांच्या वतीने आवाहन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन समाधान माळी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More