सोनवणे परिवाराचा आनंदाचा दिवस.
चोपडा (प्रतिनिधी):- नानासाहेब शंकरराव नाटू सोनवणे माजी सरपंच हातेड़ बु।। वय ८६ (वर्ष ) हे कोरोना सारख्या जीवघेण्या आजारावर यशस्वी मात करून चोपडा उपजिल्हा रुग्णालयातुन घरी येत आहेत.आजच्या ह्याच सुवर्ण क्षणाची वाट पूर्ण परिवार व आमच्या परिवारावर प्रेम करणारे सर्व आपतेष्ठ नातेवाईक व मित्र परिवार पाहत होते...तो क्षण आपल्या सर्वांच्या कृपाआशीर्वादाने व देवासारख्या देवदूत डॉक्टर्स मंडळीच्यां अथक परिश्रमाने साक्षात अनुभवता आला.

आज आमचे नानासाहेब शंकरराव नाटू सोनवणे सुखरूप घरी येत असतानां परमेश्वराची कुपा तर होतीच पण रुग्णालयाचे डॉक्टर मनोज पाटील, डॉक्टर गुरुप्रसाद वाघ तसेच डॉ.सुरेश पाटिल व त्यांचे सर्व सहकारी, कर्मचारीवृंद ,डॉक्टर्स , नर्सेस, वॉर्डबॉय सर्वांचे मनापासून कौतुक व अभिनंदन करतो. खाजगी रुग्णालया पेक्षा तसूभरही कमी नाही अशी सेवा चोपडा उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात येत आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये डॉक्टर पी. पी. ई किट घालून तर काही डॉक्टर लांबूनच कंपाउंडर च्या माध्यमातून सेवा देण्याचे काम करीत आहेत.

आणि चोपडा उपजिल्हा रुग्णालयाची शंभर खाटांची क्षमता असताना त्या ठिकाणी जवळपास दुप्पट रूग्ण उपचार घेत आहेत. त्यांचा उपचार करत असताना कुठलेही पी पी ई किट डॉ. मनोज पाटील व डॉ. गुरुप्रसाद वाघ डॉ सुरेश पाटिल घालत नाहीत. रुग्णांच्या डोक्यावर हात ठेवतात,पाठीवर हात ठेवून त्यांचं मनोबल वाढवतात, त्यांच्याशी हितगुज साधतात, त्यांची मानसिकता सुधारतात अशा डॉक्टरांचे.जे आपला एक एक क्षण लोकांचे प्राण वाचविण्यासाठी देत असतील अशा गोरगरिबांचे जीव वाचवणारे डॉक्टरांचे मनापासून कौतुक झाले पाहिजे रुग्णांचा सांभाळ करीत असतांना अभिनंदनच केले पाहिजे.डॉ मनोज पाटिल त्यांचे व डॉक्टर वाघ डॉ .सुरेश पाटिल शासकीय रुग्णालयात प्रयत्नांची पराकाष्टा करणाऱ्या डॉक्टरांचं आपल्या शासकीय रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या रुग्णांची संख्या फार मोठी आहे. तालुक्यातून दहा हजार रुग्ण कोरोना तून बरे झाले आहेत यात उपजिल्हा रुग्णालयाचा सिंहाचा वाटा आहे. हे एकमेव असे जिल्ह्यातले रुग्णालय आहे जिथे जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी येत आहे. फुल असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात. कुणीतरी चांगल काम करतं त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप असावी... माझ्या स्वानुभवावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे लाभलेले सहकार्य, त्यांनी केलेला रुग्णांवरील उपचार याबाबत मी अत्यंत समाधानी असून. एखाद्या खाजगी रुग्णालया प्रमाणे चोपडा उपजिल्हा रूग्णालय सेवा देत आहे याचा मला अभिमान आहे म्हणून रूग्णालयातील सर्व डॉक्टर,नर्स, व सर्व कर्मचारी मनापासून कौतुक करतो व त्यांचे मनोबल वाढावं त्यांनी असेच काम करत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करून त्या सर्वांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त केल्या या प्रसंगी एस बी पाटील,देविदास शंकरराव सोनवणे ,प्रवीण सोनवणे,गणेश सोनवणे,संभाजी सोनवणे सनी पाटील उपस्थित होते













