भारतीय जनता युवा मोर्चा शहाराध्यक्ष्यांची चोपडा कोविड सेंटरमध्ये हुज्जतबाजी

भारतीय जनता युवा मोर्चा शहाराध्यक्ष्यांची चोपडा कोविड सेंटरमध्ये हुज्जतबाजी
चोपडा प्रतिनिधी :——
येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तुषार पाठक यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने ते दि. 14 एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला उपचारासाठी गेले असता त्या दरम्यान कर्तव्यावर असलेले डॉ किरण भागवत पाटील यांच्याशी हुज्जतबाजी केल्याने त्यांच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे .


सविस्तर वृत्त असे की , भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तूषार पाठक यांना श्‍वास घेण्याच्या त्रास जाणवत अअसल्या कारणाने तपासणी व उपचारासाठी ते उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला गेले असता त्यावेळी कर्तव्यावर असलेले डॉ किरण भागवत पाटील यांनी त्यांची तपासणी केलीअसता तुषार पाठक यांची ऑक्सिजन लेवल 99 आली , डॉ किरण पाटील यांनी त्यांना तुम्ही पुढील उपचारासाठी नॉन कोविड सेंटरला जा असे सांगितले असता, त्याचा राग येऊन कर्तव्यावर असलेले डॉ किरण भागवत पाटील व साक्षीदार यांना तुषार पाठक यांनी शिवीगाळ करून तुम्ही मला बाहेर भेटा मग तुम्हाला बघतो ,मी मोठ्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे.

असे म्हणून दमबाजी करून फिर्यादीच्या शासकीय कामात अडथळा आणला व आरोपीने दारूची नशा केली होती त्याने दारुच्या नशेत शासकीय ऑक्सी मीटर फरशीवर आपटून त्याचे नुकसान केले आहे तसेच केस पेपरही खाली फेकून दिले या कारणावरून आरोपीविरुद्ध भाग-6 गु र नं 126/ 2021 भादवि कलम 186 ,504 , 506 , 427 , 85 (1) प्रमाणे चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे . पुढील तपास पो ना शेषराव तोरे करीत आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More