तंबाखू चे दुष्परिणाम बघून ताज पान सेन्टर बंद करून उघडली ताज दूध डेअरी चोपडा येथील तौसिफ शेख चे कौतुकास्पद कार्य,,,

चोपडा, येथील आझाद चौक भागात सुप्रसिद्ध अशी ताज पान सेंटर नावाने पान टपरी होती हाजी एजाज शेख यांची मालकी गेल्या 25 वर्षा पासून अविरत सुरू होती 2 वर्षा पूर्वी या पान टपरी वर हाजी एजाज शेख यांचा मुलगा तौसिफ शेख हे बसू लागला
सर्वात जास्त या दुकानातून तंबाखू ची विक्री व्हयची पण तंबाखू ,सिगारेट मुळे तोंडाचे व घशाचे कॅन्सर होतो आणि तरुण पिढी या व्यसना कडे जास्त प्रमाणात वडली असून लोकांचा आरोग्य चा प्रशना विषयी व चोपडा शहरातून चालवल्या जाणारा तंबाखू विरोधी अभियान व ते चालविणारे राज मोहम्मद खान शिकलगर यांचा अभियान ने प्रेरीत होऊन व कॅन्सर पीडित लोकांना बघून तौसिफ शेख हा तरुण विचलित होत असे या तरुणाने धाडसी निर्णय घेतले पान टपरी बंद करून दूध डेअरी उघड न्याचा निश्चय केला व दुध डेअरी उघडली या निर्णयामुळे तौसिफ शेख सर्व स्तरावर कौतुक करण्यात आले नुकतीच त्यांचा ताज दूध डेअरी ला जिल्हा तंबाखू नियंत्रण सल्लागार डॉ नितीन भरती,सलाम मुंबई फाउंडेशन चे जळगाव जिल्हा समनवयक जयेश माळी, व जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती सदस्य राज मोहम्मद खान शिकलगर यांनी भेट दिली या वेळी अधिकाऱ्यांनी तौसिफ शेख चे अभिनंदन केले व जळगाव जिल्हा जागतिक स्तरावर जेव्हा तंबाखू मुक्त शाळे चा घोषित होईल त्या वेळी जिल्हास्तरीय कार्यक्रमात हाजी एजाज शेख व तौसिफ शेख यांचे विशेष सत्कार करण्यात येणार आहे ,असा युकांन उचललेले निर्णय हे कौतुकास्पद आहे












