तापी नदी पात्रातुन वाळुची चोरटी वाहतुक जेसिबी, डंपर जप्त, तिघांविरुध्द गुन्हा दाखल
१४ लाखाचा मुद्दे माल जप्त : अडावद पोलीसांची कारवाई

तापी नदी पात्रातुन वाळुची चोरटी वाहतुक
जेसिबी, डंपर जप्त, तिघांविरुध्द गुन्हा दाखल
१४ लाखाचा मुद्दे माल जप्त : अडावद पोलीसांची कारवाई

चोपडा प्रतिनिधी :—
तापी नदी पात्रातुन मोठ्या प्रमाणावर वाळुची चोरटी वाहतुक सुरु असल्याची गुप्त माहिती मिळल्याने अडावद पोलीसांनी वटार शिवारातील तापी पात्रात छापा टाकला असता वाळु वाहतुक करणारे डंपर, जेसिबी पोलीसांनी जप्त केले आहे.

तर वाहन चालक-मालक अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. यामुळे वाळु तस्करांची धाबे दणाणली आहे.
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत परिसरात वाळुची चोरटी वाहतुक सर्रास चालते. याकडे महसुल विभागासह पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा सुर आवळला जात असतांनाच अडावद पोलीस ठाण्याचे सपोनी किरण दांडगे यांनी चोरटी वाळु वाहतुक करणाऱ्यां विरुध्द मोठी कारवाई केली आहे. दि. १८ रोजी मध्यरात्री अडावद पोलीसांना वाळु वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती मिळली. सपोनी किरण दांडगे, परि.पोउनि. महेश घायतड, पोना. नशिर तडवी, योगेश गोसावी आपल्या ताफ्यासह वटार गावालगतच्या तापी नदी पात्रात गेले असता जेसिबीच्यासाह्यांने डंपरमध्ये अवैधरित्या वाळु भरुन वाहतुक केली जात असल्याचे आढळुन आले.

पोलीसांनी घटनेची शाहनिशा करता ४ लाख रुपये किंमतीचे डंपर क्र.एम.एच १९ झेड. २३५० तसेच १० लाख रुपये किंमतीचे जेसिबी क्र. एम.एच २८ ए.जे. २४५६ व ४ हजार रुपये किंमतीची १ ब्रास वाळू असा १४ लाख रुपयांचा मुदेमाल जप्त केला. तर चालक मालक असलेले किरण रेवणात सिमरे (वय- ३२ रा. कमळगाव ता.चोपडा), मंगल कैलास इंगळे (रा.मितावली), नितीन गजानन बाविस्कर रा. साकेगाव या तिघांना अटक करण्यात आली आहे. संशयीतांना न्यायालयात हजर केले असता १ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याचे पोलीसांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More