चौगाव परीसरात भुरट्या चोरांचा हैदोस शेती शिवारातून स्टार्टर , अँटोस्विच चोरी

चौगाव शेती शिवारातून स्टार्टर , अँटोस्विच चोरी
चोपडा प्रतिनिधी :—–
चोपडा तालुक्यातील चौगाव येथील शेतकरी विश्राम सुकदेव धनगर (तेले) यांच्या मालकीच्या चौगाव शेत शिवारातील गट नं.४४५/२ या शेतातून दि १९ एप्रिल रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी ईलेक्ट्रीक पोलला बसवलेल्या पत्री पेटीतून कुलूप तोडून स्टार्टर ,अँटोस्विच,फ्युज,पकड,पेचिंस ईत्यादी सुमारे पाच ते सहा हजार रुपयाचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे .


दि २० रोजी सकाळी आठ वाजता विश्राम धनगर मोटर चालू करण्यासाठी गेले असता सदरचा प्रकार लक्षात आला.सर्व शेजारील शेतकऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनाही सदर प्रकार माहीत नसल्याचे सांगितल्यानंतर विश्राम तेले यांनी चौगाव गावाचे पोलिस पाटिल गोरख हरचंद पाटिल यांना सदर प्रकार दुरध्वनीवरून सांगितला व त्यांच्या सांगण्यानुसार चोपडा ग्रामिण पोलिस स्टेशनला फिर्याद दिली.


सदर अज्ञात चोरट्यांविरूद्ध कलम ३७९ नुसार दि २० रोजी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास हवलदार संजय निंबा यदे हे करीतआहेत.


चौगाव परीसरात भुरट्या चोरांचा जास्त हैदोस वाढला असून त्यांचा त्वरीत बंदोबस्त व्हावा अशी मागणी विश्राम तेले यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप आराक यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More