कोरोना आपत्तीशी लढण्यासाठी चोपड्याचे डॉक्टर सरसावले
पाच लाख रुपयांची दिली आर्थिक मदत

कोरोना आपत्तीशी लढण्यासाठी चोपड्याचे डॉक्टर सरसावले
पाच लाख रुपयांची दिली आर्थिक मदत
चोपडा प्रतिनिधी :—–
चोपडा शहर व तालुक्यात कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजविला आहे .तालुक्यातील कोरोनाचा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे , तालुक्यातील रुग्णसंख्या तेरा हजारांच्या वर असून मृत्यू दोनशेच्या जवळपास आहेत .

दररोज रुग्णसंख्या शंभरीच्या वर येत आहेत , अशा बिकट परिस्थितीत शासनाची मदत अपुरी पडत आहे हे लक्षात आल्यावर चोपडा शहर व तालुक्यातील दानशूर दात्यांनी आतापर्यंत कोविडच्या विविध प्रकारच्या सुविधांसाठी त्यात विशेष ऑक्सिजनचा पाईपलाईन साठी सुमारे दहा लाखांचा जवळपास मदत केली आहे .


जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्वात प्रथम लोकसहभागातून ऑक्सिजन पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे .सदर बाबींची दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन सदर प्रोजेक्ट संपूर्ण जिल्हाभर राबविला आहे.
चोपडा तालुक्यात तीन शासकीय कोविड सेंटरच्या माध्यमातून व सहा खाजगी कोविड सेंटरच्या माध्यमातून तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत .तालुक्यातील अनेक दात्यांनी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलत कोविड आपत्ती व्यवस्थापनसाठी मदत केली आहे , या गोष्टीचा सर्वांना सार्थ अभिमान आहे.


या पार्श्वभूमीवर चोपडा येथील डॉक्टर बंधूंनी पाच लाख रुपयांचे धनादेश ( आर्थिक मदत ) तहसीलदार अनिल गावित यांचेकडे दि २० रोजी सुपूर्द केले आहेत.


त्यात चोपडा येथील नृसिंह हॉस्पिटल चे डॉ दिलीप पाटील व डॉ दीपक पाटील , हरताळकर हॉस्पिटलचे संचालक डॉ विकास हरताळकर व डॉ अमित आणि डॉ विनीत हरताळकर , चैतन्य हॉस्पिटलचे संचालक डॉ लोकेन्द्र महाजन , पाटील हॉस्पिटलचे संचालक डॉ शरद पाटील व डॉ भरत पाटील , सुविचार हॉस्पिटलचे संचालक डॉ आनंद पाटील,डॉ हेमंत पाटील यांनी प्रत्येकी एक लाख रुपये असे एकूण पाच लाख रुपयांची आर्थिक मदत कोविड साठी दिली आहे .
यावेळी गटविकास अधिकारी बी एस कोसोदे ,शेतकरी कृती समितीचे एस बी पाटील, नगरपालिका गटनेते जिवन चौधरी,नायब तहसीलदार महेश साळुंखे हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More