चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात मिनी ऑक्सिजन प्लांट उभारण्या करिता तीन दिवसात ७,५८,००० निधी जमा

चोपडा (प्रतिनिधी) :- आज राष्ट्रीय आपत्तीच्या काळात वरील चित्रातली परिस्थिती येवू नये यासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आपण एक छोटा प्रयत्न करीत असून ऑक्सिजन प्लांट उभा करीत आहोत,त्यासाठी परवा काही डॉक्टर बांधवांनी ₹ ५,००,०००/- ,काल दोन मेडिकल दुकानदार बांधवांनी ₹५१०००/- दिलेत व आज चोपडा येथील आयुर्वेद डॉक्टरांचे संघटनेच्या (निमा) शाखेने ₹ ५१०००/- दिलेत. तर चोपडा आय एम ए ह्या डॉक्टरांचे संघटनेने ₹ १,०५,०००/- ,समर्थ स्कॅन सेंटर ने ₹ ३१०००/-,डॉ चंद्रकांत बारेला यांनी ₹ २००००/- असे गेल्या तीन दिवसात एकूण ₹७,५८,०००/- मा प्रांत अधिकारी श्री सुमित शिंदे व तहसीलदार श्री अनिल गावित ,नायब तहसीलदार साळुंखे,डॉ मनोज पाटील व एस बी पाटील यांचेकडे जमा केलेत.यावेळी आय एम ए चे डॉ दीपक चौधरी,डॉ जैस्वाल,डॉ नरेंद्र शिरसाठ,डॉ मंगेश वैद्य तर निमाचे डॉ संजय पाटील, डॉ सोहलाल पाटील,डॉ अशोक पाटील,डॉ रवींद्र पाटील,डॉ अनंत महाजन,डॉ चंद्रकांत बारेला,डॉ गोकुळ पाटील,मयुर नानेकर व दिव्याक सावंत हजर होते…


बांधवांनो लक्ष मोठे आहे परंतूअजून बऱ्याच संघटना व व्यक्ती मदतीसाठी पुढे येत आहेत. तरी तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी मिनी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सरळ हाताने मदत करण्याचे आव्हान एस.बी.पाटील यांनी केले आहे व मदत करणाऱ्यांचे साऱ्यांचे आभार मानले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More