रोटरी क्लब ऑफ़ चोपडा तर्फे 3 ऑक्सिजन काँसंट्रेटर मशिन्सचे लोकार्पण

रोटरी क्लब ऑफ़ चोपडा तर्फे 3 ऑक्सिजन काँसंट्रेटर मशिन्सचे लोकार्पण
चोपडा प्रतिनिधी : —–
कोरोना महामारीमुळे नागरिक सर्वत्र त्रस्त आहेत . जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा देखील जाणवत आहे. अशावेळी रुग्णांना काहीसा दिलासा देण्यासाठी रोटरी क्लब चोपडाने तीन ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन दि व 23 एप्रिल रोजी उपलब्ध करून दिले आहेत.


चोपडा शहरातील रुग्णांसाठी अल्पदरात भाडे घेऊन हे सामान्य नागरिकांना घरी मिळू शकणार आहे. जे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत, मात्र त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार काही काळ ऑक्सिजन लागण्याची शक्यता असते अशा रुग्णांना हे काँसंट्रेटर ऑक्सिजन मशीन मिळू शकणार आहेत.
प्रांत सुमित शिंदे व तहसीलदार अनिल गावित यांच्या हस्ते कॉन्सट्रेटर लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी रोटरी अध्यक्ष नितिन अहीरराव, सचिव रुपेश पाटिल, पुनम गुजराथी, डॉ ललित चौधरी, एम डब्लू पाटिल, अरुण सपकाळे, महेंद्र बोरसे , प्रफ्फुल गुजराथी, प्रवीण मिस्त्री,चंद्रशेखर साखरे,सुनील महाजन, अर्प्रित अग्रवाल, पंकज बोरोले, चेतन टाटिया आदी उपस्थित होते.


विजेवर चालणारे हे मशिन हवेतुन आणि पात्रता मधुन ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सक्षम आहे.मिनीटाला पाच ते दहा लिटर्स इतका ऑक्सिजन पुरवठा करता येवू शकतो.सद्यस्थितीत हे मशिन कोरोना रुग्नांसाठी वरदान ठरत आहे.बाहेर वाढलेल्या ऑक्सिजन सिलेंडरच्या किंमती व टंचाई पाहता व वापरण्यास सोपे असल्याने हे मशिन उपयुक्त ठरणार आहे.


शरिरातील ऑक्सिजनची पातळी ९०% ते ९२% च्या खाली आल्यावर ऑक्सिजन सपोर्ट लागतो.डॉक्टरांच्या सल्ल्याने अश्या रुग्णांना ह्या मशिनद्वारे ऑक्सिजन पुरवठा करता येईल.काही रुग्ण कोविड मधुन बरे झाल्यानंतरही त्यांना कित्येक महिने ऑक्सिजनची गरज भासते.अशा होम आयसोलेशनच्या रुग्नांसाठी हे मशिन फारच उपयुक्त ठरणार आहे.


गरजु रुग्णांनी यमुनाई हॉस्पिटल,समर्थ पॅलेस समोर,यावल रोड येथील रोटरी क्लबच्या “रुग्ण सेवा” या ऑर्थोपेडिक लायब्ररी येथे मोब.न.80876 71216, 9823355599 वर संपर्क करावा असे आवाहन चोपडा रोटरी क्लब कडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More