राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोफत झुणका भाकर केंद्राचे उद्घाटन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोफत झुणका भाकर केंद्राचे उद्घाटन
चोपडा प्रतिनिधी :—–
चोपडा शहर व चोपडा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव असल्याने चोपडा शहरात लाॅकडाउन करण्यात आले आहे .त्यामुळे उपजिल्हा रुग्नालयात जे रुग्ण उपचार घेत आहेत त्यांचे नातेवाईक व हातमजुरीवर काम करणारे अनेक रुग्णांचे नातेवाईक खेड्यावरून आलेले असतात यांच्या सेवेसाठी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचा वतीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील परीसरात दिनांक २४ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत मोफत झुणका भाकर केंद्र सुरू करण्यात आले आहे.

या सामाजिक उपक्रमामुळे गरजूंना मोफत व चवदार झुणका भाकर उपलब्ध होणार आहे . या सामाजिक उपक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र राज्य विधान सभेचे माजी अध्यक्ष प्रा अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले .


सदर उद्घाटन प्रसंगी चंद्रहास गुजराथी , ऍड घनश्याम पाटील , राजेंद्र पाटील , मनिषा चौधरी , जीवन चौधरी , गोकुळ पाटील , प्रविण गुजराथी , नेमीचंद जैन , रमेश शिंदे , गोपाळराव सोनवणे यांसह आदी उपस्थित होते .


सदर उद्घाटन प्रसंगी तालुक्यातील , व शहरातील राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More