वेले – आखतवडे ग्रामपंचायतीने कोरोना महामारीच्या काळात केला शेतीचा जाहीर लिलाव
केले जमावबंदीचे उल्लंघन ,
संबंधितांवर कारवाईची मागणी

वेले – आखतवडे ग्रामपंचायतीने कोरोना महामारीच्या काळात केला शेतीचा जाहीर लिलाव
केले जमावबंदीचे उल्लंघन ,
संबंधितांवर कारवाईची मागणी …..


चोपडा प्रतिनिधी :—–
संपूर्ण देशासह चोपडा तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असताना मात्र चोपडा तालुक्यातील वेले – आखतवाडे ग्रामपंचायतीने शासनाचे कोरोनाचा संदर्भाचे सर्व नियम धाब्यावर बसवून दि १ मे महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या शेत जमिनीचा गावात दवंडी देऊन ग्रामपंचायतीच्या समोर मंडप व सतरंजी टाकून कोरोनाचे नियम विसरून शेत जमिनीचा जाहीर लिलाव करण्याचा प्रकार घडला आहे


त्यास ग्रामसेवक व काही सदस्यांचा विरोध असताना सुद्धा सरपंच उपसरपंच यांनी कोणाचे काही न ऐकता प्रचंड गर्दी करून जवळपास शंभर ते दीडशे लोकांच्या जनसमुदाय सदर लिलावाच्या वेळेस ग्रामपंचायतीच्या मंडपात उपस्थित होता. सदर लिलावास सुरू झाल्या नंतर काही ग्रामस्थांनी व सुज्ञ लोकांनी विरोध केला असता सरपंच व उपसरपंच यांनी कोणाचे काहीही न ऐकता लिलाव प्रक्रिया सुरू ठेवली .


महिनाभराच्या काळात वेले – आखतवाडे गावात जवळपास दोनशे लोक कोरोनाने पॉझिटिव आहेत तर वीस लोकांचा मृत्यू झाला असून अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या जमावबंदीचे उल्लंघन वेले – आखतवाडे येथील सरपंच व उपसरपंच तसेच काही ग्रामपंचायत सदस्य यांनी केले असून व जनतेच्या आरोग्याशी व जीवाशी , भावनांशी खेळून या महामारीला एकप्रकारे आमंत्रण देण्याचे काम ग्रामपंचायतीकडून केले गेले म्हणून सदर घटनेकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून दिलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ भारतीय अधिनियम १८९७ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे लेखी निवेदन व तक्रार अर्ज चोपडा शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात ताला आहे .सदर अर्जावर विनोद सुधाकर पाटील ,रघुनाथ भाईदास पाटील , ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील , दीपक रमेश पाटील ,प्रमोद नारायण पाटील , मनोज रोहिदास फुलपगारे ,विजय दगडू पाटील , दिपाली प्रवीण पाटील यासह अनेक ग्रामस्थांच्या व सुज्ञ नागरिकांच्या सह्या आहेत….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More