आस्थापना वेळेवर बंद करण्यासाठी चोपडा नगरपालिका वाजविणार भोंगा

आस्थापना वेळेवर बंद करण्यासाठी चोपडा नगरपालिका वाजविणार भोंगा
चोपडा प्रतिनिधी :—–


राज्य शासनाच्या दि. २९ च्या ब्रेक द चैन या आदेशान्वये कोव्हिड १९ चा प्रसार व प्रादुर्भाव रोखणेकामी संपुर्ण राज्यात दि १५ रोजी सकाळी ७ वाजेपावेतो संचारबंदीसह विशेष निर्बंध लागू करणेत आलेले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी जळगांव यांनी सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ दुकाने (चिकन, मटन, पोल्ट्री, मासे व अंडी विक्रेते सहित), कृषी संबंधित उपकरणे व शेती उत्पादने, पाळीव प्राण्यांची खाद्य विक्री करणारे दुकाने, पावसाळ्याचा हंगामासाठीचे साहित्य विक्री करणारे दुकाने किंवा संस्थाने हे दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत फक्त उक्त नमूद अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने, आस्थापना सुरु राहतील असे आदेश पारित केले आहेत.


त्याअनुषंगाने चोपडा शहरातील सर्व नागरिक, दुकानदार, आस्थापना यांना आवाहन करणेत येते की, अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व आस्थापना पूर्ण वेळ बंद राहतील तसेच दररोज नगरपरिषदेतर्फे अत्यावश्यक सेवा देणारी आस्थापना यांना सकाळी ११ वाजता बंद करणेचे सूचना देणेकामी सकाळी पावणे अकरा वाजता इशारा भोंगा वाजविणेत येईल व पुन्हा सकाळी ११ वाजता सर्व आस्थापना, दुकाने बंद करणेकामी अंतिम इशारा भोंगा वाजविणेत येईल त्यानंतर दुकाने, आस्थापना सुरु राहिल्यास संबंधिताविरुध्द कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करणेत येईल याची गांर्भीयाने नोंद घ्यावी.असे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी पत्राद्वारे सूचित केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More