चोपड्यात जुगार अड्ड्यावर धाड , चार लाख एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत , अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी यांची मोठी कारवाई
चोपडा प्रतिनिधी :-

अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांना गुप्त बातमी मिळाल्याचा अनुषंगाने त्यांनी पंचा समक्ष आपल्या साथीदारांसह श्रीराम नगर मधील तेली समाज मंगल कार्यालयासमोरील लक्ष्मण दौलत पाटील हा आपल्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर मांग पत्तीचा , पत्त्यांचा जुगाराचा खेळ खेळत व खेळवत असतानाच त्याच्यासह इतर 20 आरोपीं व चार लाख एकसष्ठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे .
सर्व आरोपीं विरुध्द चोपडा शहर पोलीस स्टेशनला भाग-६ गु र नं १५५/ २०२१ मुंबई जुगार ॲक्ट कलम ४ , ५ व ६ भादवि कलम १८८ , २६९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव व कार्यालयातील प्रकाश चव्हाण , मेघराज महाजन , प्रवीण बेलदार , आशिष चौधरी ,गणेश पाटील यांनी पंचा समक्ष सदर कारवाई केली आहे .
चोपडा शहरातील श्रीराम नगर भागात तेली समाज मंगल कार्यालयासमोर लक्ष्मण दौलत पाटील हा त्यांचे राहते घराच्या वरील मजल्यावर पैशांवर मांग पत्ती नावाच्या पत्ता जुगाराच्या खेळ खेळत व खेळवत असताना त्यांच्यावर छापा टाकण्यात आला .
त्यात लक्ष्मण दौलत पाटील , संजय श्रावण पाटील , जितेंद्र लक्ष्मण पाटील , श्याम राजेंद्र पाटील ,विकी बापू वाघ , संकेत प्रसंना देशमुख , दीपक विश्वासराव पाटील ,पवन नवल माळी ,कन्हैया सुपडू बारी , प्रथमेश संजय चौधरी , उमेश धनराज पाटील , नितीन रमेश पाटील , गणेश देविदास चौधरी , विशाल सुनील मकवाना , किशोर रमेश पाटील , सागर श्रीराम शिंपी , राकेश दीपक शिंपी , गोपाल पांडुरंग चौधरी , शुभम दत्तात्रय राजोर , धनराज रमेश चौधरी , विशाल कैलास पाटील इत्यादी ना पोलिसांनी रंगेहाथ पकडले .

एकूण चार लाख एकसष्ट हजार सहाशे सत्तर रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला असून त्यात चोवीस हजार सहाशे सत्तर रुपये रोख , दोन लाख साठ हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली व एक लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे .
दोन पंचांसमक्ष राकेश जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी अंमळनेर यांनी घटनास्थळाचा पंचनामा जागीच करून गुन्ह्यातील मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कारवाई करिता ताब्यात घेऊन चोपडा शहर पोलीस स्टेशनला घेऊन आले आहेत तरी चार मे रोजी पावणे अकरा वाजता चोपडा शहरात श्रीराम नगर भागात मंगल कार्यालयासमोर आरोपी क्रमांक एक लक्ष्मण दौलत पाटील व त्यांचे राहते घराचे वरील मजल्यावर बंद खोलीत आरोपी क्रमांक दोन ते एकवीस यांच्यासह आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी बावन्न पत्त्यांच्या कट वर मांग पत्ती नावाच्या पत्ता जुगाराचा खेळ खेळतांना व खेळतांना तोंडाला मास न लावता व कोरोना रोगा संदर्भात कोणत्याही प्रकारची खबरदारी न बाळगता कोरोनाचा आजाराचा संसर्ग पसरण्याची हयगय ची कृती करून पत्ता जुगाराचे साधने व रोख रक्कम रुपये मोटरसायकल व मोबाईल असे एकूण चार लाख एकशष्ट हजार सहाशे सत्तर रुपये मुद्देमालासह मिळून आले आहेत .फिर्याद पोहेका पंकज श्यामराव पाटील यांनी दिली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव करीत आहेत .

अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवरील मोठी कारवाई समजली जात आहे , तरी जुगार अड्डा चालकांनी मोठी धास्ती घेतल्याचे शहरात बोलले जात आहे












