लासूर येथील ग्रामपंचायत सदस्याकडून माहिती अधिकार टाकणाऱ्या तरुणासह कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी,चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला  तिघांविरुध्द गुन्हा दाखल

लासूर येथील ग्रामपंचायत सदस्याकडून माहिती अधिकार टाकणाऱ्या तरुणासह कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी,चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला  तिघांविरुध्द गुन्हा दाखल

चोपडा तालुक्यातील लासूर येथील  ग्रामपंचायत सदस्याकडून माहिती अधिकार टाकणाऱ्या तरुणासह कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या फिर्यादीवरुन तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लासूर येथील ग्राम पंचायत सदस्य सुरेश हारचंद माळी यांना तीन अपत्ये असल्यामुळे गावातील रहिवासी इम्रान मुनाफ मण्यार या तरूणाने ग्रामपंचायत मध्ये माहीतचा अधिकार देवून माहिती मागितली असता

त्याचा राग डोक्यात ठेवून ग्राम पंचायत सदस्य सुरेश हारचंद माळी यांनी इम्रान मण्यार याचे वडील मुनाफ मण्यार व आई हाबीदा मण्यार यांना दि.६ गुरूवारी संध्याकाळी सहा वाजता घरी येऊन अर्वाच्य भाषेत शिवी गाळ करून माझ्या विरुद्ध का माहितीचा अधिकार टाकला, तुमच्या मुलाची फोरव्हिलर गाडी कशी रस्त्यावर चालवतोस मी पाहून घेईन, मी कोण आहे माझी ताकद तुम्हाला माहित नाही का असे म्हणत जिवे ठार मारण्याची धमकी सुरेश माळी यांनी दिल्याची फिर्याद इम्रान मण्यार व हाबीदा मण्यार यांनी पोलिसात दिली.

सदर फिर्यादी वरून ग्रामपंचायत सदस्य सुरेश हारचंद माळी त्याचा भाऊ तुषार हारचंद माळी व साथीदार भुषण चिमण माळी यांच्या विरोधात भारतीय दंड १८६० अन्वये भादवी कलम ५२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More