तावसे बु!! येथील तरुणाच्या शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

तावसे बु!! येथील तरुणाच्या शॉक लागून दुर्दैवी मृत्यू
चोपडा प्रतिनिधी :—-


तालुक्यातील तावसे बु!! येथील १९ वर्षीय तरुण अक्षय राजेंद्र पाटील याचा पाण्याच्या मोटारीचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .


सविस्तर वृत्त असे की , राजेंद्र सोपान पाटील यांच्या घराच्या स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. मिस्त्री व मजूर लोकांना स्लॅबच्या कामासाठी पाणी लागणार होते त्यासाठी पाण्याचे टँकरही उपलब्ध करुन देण्यात आले होते पण पाण्याचे टॅंकर व घराचा स्लॅब यात जास्त अंतर असल्याने पाण्याची व्यवस्था जवळच असावी म्हणून अक्षयने आपल्या घरातील पाण्याची मोटार आणली व तिची जोडणी करत असताना अचानक त्यास शॉक लागल्याने अक्षय जोराने पाण्याच्या टँकरवर फेकला गेल्याने त्याच्या डोक्यात जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला .


अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे . आई-वडील नातेवाईकांसह ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे . अक्षय हा राजेंद्र सोपान पाटील (आव्हाणेकर ) यांचा थोरला मुलगा असून तो इयत्ता बारावीत शिक्षण घेत होता….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More