चोपडा येथील सहा वर्षीय अफनान रईस शेख या बालकाचे चार रोजा ( उपवास)संपन्न

चोपडा येथील सहा वर्षीय अफनान रईस शेख या बालकाचे चार रोजा ( उपवास)संपन्न
चोपडा प्रतिनिधी :—–


चोपडा येथील सहा वर्षीय अफनान रईस शेख राहणार हमीद नगर या बालकाने रोजाचे चार उपवास पूर्ण केले आहेत . कोरोनाची महामारी आपल्या देशातून लवकर हद्दपार होवो अशी प्रार्थना तिने अल्लाह कडे केली आहे .कोरोना महामारी पासून आपल्या देशातील सर्व लहान-थोर सुखरूप राहावेत तसेच कोरोनाचे संकट लवकर जावो अशी तिने आपल्या उपवासा द्वारे अल्लाहला प्रार्थना केली आहे .


मानवतेला संदेश देणाऱ्या रमजान महिन्याचा २६ व्या रोज्याच्या दिवशी चवथा रोज पूर्ण केला आहे . मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव , सद्भाव वाढविणाऱ्या रमजान महिना हा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो . याला बरकतीचा महिना असेही म्हणतात .संयम , त्याग , शांतता , सहिष्णुता ,चांगुलपणा , प्रामाणिकपणा रुजविणाऱ्या या महिन्याला मुस्लिम धर्मामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे .या महिन्याची मुस्लिम बांधव चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत असतात .
अल्पवयात रोजा (उपवास ) करत असल्याने सहा वर्षीय बालकांचे सर्वत्र कौतुक होत आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More