आरोग्य सभापती सौ.सुप्रिया सनेर यांची लसीकरण केंद्रास भेट व लसीकरणासाठी जनतेस आवाहन

आरोग्य सभापती सौ.सुप्रिया सनेर यांची लसीकरण केंद्रास भेट व लसीकरणासाठी जनतेस आवाहन
चोपडा प्रतिनिधी ——


चोपडा नगरपरिषदेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ ते ४४ ह्या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण दि ६ मे पासून सुरू झाले .पहिल्या दिवशी लसीकरण उशिरा सुरू झाल्याने काही नागरिक वंचित राहिले त्यामुळे आरोग्य सभापती सौ.सुप्रिया सनेर यांनी दि ७ व ८ मे रोजी लसीकरण केंद्रास भेट दिली.

सकाळी ९ वाजेपासून लसीकरण केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली असता काही त्रुटी आढळून आल्या. त्या सर्व त्रुटिंचे निराकरण करण्याच्या सूचना तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांसाठी टेंटची व्यवस्था करणे , पाण्याची व्यवस्था करणे या विषयी वैदयकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला यांना सूचना देण्यात आल्यात.लसीकरण केंद्रावर तालुक्याबाहेरील कुणीही व्यक्ती रजिस्ट्रेशन करू शकत असल्याने स्थानिक नागरिक नाखूश दिसले.काही नागरिकांनी फक्त रजिस्ट्रेशन केलेले असल्याने आणि अपॉइंटमेंट न भेटल्याने केंद्रावरून परत जावे लागले.सध्या लसीकरण घेण्यासाठी नागरिकांचा कल वाढला असल्याने यांचे कौतुकही सभापती यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More