नागलवाडी येथे जुगार अड्ड्यावर धाड , एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत , चोपडा शहर पोलिसांची कारवाई

नागलवाडी येथे जुगार अड्ड्यावर धाड , एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत , चोपडा शहर पोलिसांची मोठी कारवाई
चोपडा प्रतिनिधी :——


चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना गुप्त बातमी मिळाल्याचा अनुषंगाने त्यांनी पंचा समक्ष आपल्या साथीदारांना सदर गुप्त खबर मिळाल्याचे सांगून पो कॉ संतोष पारधी यांच्या नेतृत्वात विलेश सोनवणे , ज्ञानेश्वर जवागे ,शेषराव तोरे , सुभाष सपकाळ व पंचांना सोबत घेऊन सदर घटनेची शहानिशा करण्यास सांगितले .


पो कॉ संतोष पारधी पंच व आपल्या साथीदारांना सोबत घेऊन खाजगी वाहनाने मिळालेल्या माहितीच्या थोड्या अंतरावर गाडी थांबवून पायी चालत व दबक्या आवाजात सापळा रचून रेड केली असता सदर ठिकाणी एक लाख ऐंशी हजार रुपयांचा ऐवज मिळून आला त्यात बेचाळीस हजार रुपये रोख , साठ हजार रुपये किंमतीची दोन मोटारसायकल व आठ्याहत्तर हजार रुपये किमतीचे मोबाईल हँडसेट मिळून आले आहेत .


सविस्तर वृत असे की , पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नागलवाडी येथील मनोज श्रावण पाटील यांच्या खड्याच्या बाजूला मोकळ्या सार्वजनिक जागेत काही लोक ५२ पत्त्यांचे कॅटवर पत्ता जुगाराचा खेळ खेळत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने खाजगी वाहनाने रेड केली असता गोपाळ सुरेश पाटील ,पंकज खंडू वाघ ,अनिल चंद्रभान पाटील ( वराड) , हेमराज काशिनाथ पाटील, योगीराज देवीसिंग पाटील ,राव सिंग नामदेव पाटील ,किशोर भास्कर पाटील ,सागर विकास साळुंखे , प्रमोद उदयसिंग चौधरी ,लहू छोटू पाटील , राजू विजय राणे , विजय प्रकाश पाटील , दीपक सुभाष ढिवरे , योगेश जयसिंग चौधरी इत्यादी प्रत्यक्ष जुगार खेळताना सापडून आले .पो कॉ संतोष पारधी यांनी घटना स्थळीच पंचनामा केला आहे .
पुढील तपास चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पी आय अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ संतोष पारधी करीत आहेत
अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवरील मोठी कारवाई समजली जात आहे , तरी जुगार अड्डा चालकांनी मोठी धास्ती घेतल्याचे शहरात बोलले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More