पत्रकारांना लसीकरणाची सुविधा पुरवा प्रेरणा दर्पण फाऊंडेशनची मागणी

पत्रकारांना लसीकरणाची सुविधा पुरवा
प्रेरणा दर्पण फाऊंडेशनची मागणी


चोपडा (प्रतिनिधी)- तालुक्यातील सर्वच वृत्त पत्रांचे प्रतिनिधी विविध वृत्तवाहीन्यांचे प्रतिनिधी
यांना फ्रंट लाईन वर्कर्स चा दर्जा देऊन पत्रकार व त्यांच्या परिवारांना कोविड लस देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था अथवा प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी पत्रकार तथा प्रेरणा दर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष शाम जाधव यांनी निवेदना द्वारे तहसीलदार चोपडा यांच्या कडे केली आहे.


पत्रकारांना लसीकरणाची सुविधा देण्यासाठी महाराष्ट्रा राज्य मंत्रीमंडळांतील ना.छगनराव भुजबळ,ना.बाळासाहेब थोरात,ना.निलम गोऱ्हे
आदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार करून तशी मागणी केलेली आहे.
जळगाव येथे तर पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला आहे.पत्रकार सुद्धा प्रत्येक घडामोडी जनतेपर्यंत पोचवण्यासाठी प्रशासना सोबत काम करत असतो,ज्या पद्धतीने आरोग्य सेवक,पोलीस कर्मचारी,यांना प्राधान्याने लस देण्यात आली त्याच धर्तीवर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पत्रकारांना परिवारासह कोविड लस देण्यास प्राधान्य व सुविधा मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. नायब तहसीलदार महेश साळुंखे यांनी निवेदन स्वीकारून तात्काळ अंमलबजावणी होईल असे सांगितले.यावेळी सर्वस्वी पत्रकार शाम जाधव ,चंद्रकांत पाटील, लतीश जैन,संजय बारी,तुषार सूर्यवंशी,उमेश नगराळे आदी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More