चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यामधीलअवैध गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी जप्त वाहनांना लागली अचानक आग


चोपडा प्रतिनिधी
चोपडा येथील ग्रामीण पोलिस ठाण्यातील मैदानावर अवैध गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी जप्त केलेल्या वाहनांना आग लागली होती. यामुळे या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.


महसूल प्रशासनामार्फत कारवाई केल्यानंतर अवैध गौण खनिज करणारी वाहने ग्रामीण पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिलेली आहेत. यातील काही वाहने ग्रामीण पोलिस ठाण्याच्या मैदानात लावण्यात आलेली आहेत. दरम्यान,११ मे रोजी या वाहनांना आग लागली. या आगीमुळे ट्रॅक्टरची चाके, ट्रॉली व इतर काही भागांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, ही वाहने न्यायालयीन प्रक्रियेतून वाहन मालकांच्या ताब्यात येईपर्यंत ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहेत. परंतु जप्त केलेल्या वाहनांची महसूल प्रशासन व ग्रामीण पोलिस ठाण्यात काळजी घेतली जात नसल्याचे या घटनेने दिसून आले आहे. दरम्यान, तापमान वाढल्याने जेथे कचरा होता, तेथे ट्रॅक्टरच्या चाकाला आग लागल्याचे दिसले. या संदर्भात आज चोपडा शहर पोलिसांत आगीची माहिती दिली असल्याचे ग्रामीण पोलिस ठाण्याचे एपीआय संदीप आराक म्हणाले.














