कोरोना विषाणू प्रार्दुभावाच्‍या पार्श्‍वभूमीवर चोपडा नगर परिषदेच्‍या विकास कामांचे भूमिपुजन कार्यक्रम रद्द.
मात्र विकास कामांचा शुभारंभ होणार


कोरोना विषाणू प्रार्दुभावाच्‍या पार्श्‍वभूमीवर चोपडा नगर परिषदेच्‍या विकास कामांचे भूमिपुजन कार्यक्रम रद्द.
मात्र विकास कामांचा शुभारंभ होणार

चोपडा प्रतिनिधी:-


चोपडा शहराच्‍या सर्वांगिण वि‍कासाठी चोपडा शहर विकास मंच प्रयत्‍नशिल आहे. त्‍याकामी विकास कामांचे नियोजन, त्‍याकामी निधी मागणी, निधी मिळणेकामी पाठपुरावा करणे याबाबत आम्‍ही कटीबध्‍द आहोत. अक्षय तृतीया व रमजान ईदच्‍या शुभेच्‍छा देताना नागरिकांना शुभेच्‍छा देतांना नागरिकांचे असेच प्रेम व आर्शिवाद सदैव असावी अपेक्षा नगराध्‍यक्षा सौ. मनिषा जीवन चौधरी यांनी व्‍यक्‍त केली आहे.


दि. १४ मे २०२१ रोजी अक्षय तृतीया व रमजान ईद च्‍या शुभमुहुर्तावर १. चोपडा नगरपरिषद हद्दीतील आ.क्र. ४९ सि.स.नं. ३०७८ व ३०७९ वर फिश मार्केट व पार्कींग व्‍यवस्‍था करणे (अंदाजपत्रकीय रक्‍कम रु. ३.८९ कोटी. ) २. चोपडा नगरपरिषद हद्दीतील आ.क्र. १०२ शाहू महाराज शॉपिंग सेंटर मध्‍ये तळमजल्‍यात वाढीव गाळे बांधणे व पहिला मजला बांधकाम करणे व प्रवेशद्वार करणे. (अंदाजपत्रकीय रक्‍कम रु. ५.२० कोटी. ) या कामांचे भूमीपूजन कार्यक्रम तसेच सुंदरगढी सार्वजनिक शौचालय लोकार्पण प्रतिकात्‍मक कार्यक्रम आयोजित करणेत आलेला होता.

सदर भुमीपूजन नगराध्‍यक्षा सौ. मनिषा चौधरी यांच्‍या हस्‍ते होणार होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ना. श्री. अरुणभाई गुजराथी (माजी विधानसभा अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य) व प्रमुख अथिती मा.श्री. घन:श्यामभाई अग्रवाल आणि मा.श्री.संदीपभैय्या पाटील हे होते. सदर कार्यक्रम कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करुन २० पेक्षा कमी लाकांचे उपस्थितीत करणेत येणार होता.


तथापि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून यांनी स्युमोटो याचिकेसह कोरोनाशी संबंधित विविध याचिकांवर सुनावणी चालू असताना न्यायालयाने बुधवारी विविध उद्घाटन कार्यक्रमावर बंदीबाबतीचा आदेश देण्‍यात आलेला आहे. मा. न्‍यालयाच्‍या निर्णयाचा आदेशाचा आदर करुन सदर प्रतिकात्‍मक कार्यक्रम रद्द करणेत येत आहे. तरी सदर कामांचा शुभारंभ दि. १४ मे २०२१ रोजी होत असुन सदरची कामे पुर्णत्‍वास नेऊन त्‍याचे लोकार्पण करुन नागरिकांना त्‍याचा लाभ व्‍हावा हाच चोपडा शहर विकास मंचाचा मानस आहे. कोरोना विषाणू प्रार्दुभावाची परिस्थिती पहाता पत्रकार परिषद न घेता पत्रकारांना नगराध्‍यक्षा सौ. मनिषा चौधरी, यांच्‍यामार्फत सदर माहिती देण्‍यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More