न.प.हद्दीतील जळगांव रस्ता त्वरित बनविण्यात यावा ;कॉलनी वासियांतर्फे तहसीलदार यांना निवेदन..

न.प.हद्दीतील जळगांव रस्ता त्वरित बनविण्यात यावा..
कॉलनीवासियांतर्फे तहसीलदार यांना निवेदन..


चोपडा(प्रतिनिधी) शहरातील आदर्शनगर,म. वाल्मिकीनगर, गंगाईनगर, गुरुकुलनगर मधून जाणारा न.प.हद्दीतील जळगांव रस्ता त्वरित बनवण्यात यावा,असे निवेदन कॉलनीवासियांतर्फे चोपडा तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,चोपडा गोरगावले बुद्रुक, भोकर, कानळदा मार्गे जळगाव या रस्त्याला शासनाने राज्यमार्ग म्हणून मान्यता दिलेली आहे. हा रस्ता चोपडा पासून जळगाव पर्यंत मंजूर असून पुढे या रस्त्याचे सा.बां. विभागातर्फे काम सुरू आहे. पण शहरातील न.प.हद्दीतील हा रस्ता अजूनही अपूर्णावस्थेत आहे. वास्तविक हा रस्ता चोपडा पासून बनवणे गरजेचे होते, परंतु रस्ता दुरुस्तीच्या कामाला जळगाव कडून सुरुवात करण्यात आलेली आहे

.शहरातील कॉलनी परिसरातील गटारींचे सांडपाणी व पावसाळ्यातील पाणी ह्या रस्त्यावर येत असते.त्यामुळे कायमच हा रस्ता घाण पाण्याच्या डबक्यातच असतो.ह्या रस्त्यावरून वापरताना कॉलनीवासियांना मरण यातना सहन कराव्या लागतात.पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडतात, त्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे लहान-मोठे वाहनांचा अपघात होऊन लोकांना दुखापत होत असते.मागील वर्षी पावसाळ्यात गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी चोपडा सा.बां.चे अधिकारी श्री.सुशिरसाहेब यांना ह्या रस्त्यावर प्रत्यक्ष पाहणीसाठी आणले असता पावसाळ्यानंतर लवकरच हा रस्ता बनविण्याात येईल असेही त्यांनी कॉलनीवासियांना सांगीतले होते.परंतु दुसरा पावसाळा येऊ घातला तरिही ह्या रस्तादुरूस्तीसाठी हालचाली दिसत नाहित.म्हणून चोपडा शहर न.प.हद्दीतील हा रस्ता त्वरित नवीन बनविणेकामी संबंधित विभागाने लक्ष द्यावे,अन्यथा लवकरच यावल रोडवर तीव्र रास्तारोको व ठिय्या आंदोलन करण्यात येईल,असेही या निवेदनात नमूद केलेले आहे.


ह्या निवेदनावर मधुसूदन बाविस्कर,लखिचंद बाविस्कर,वैभवराज बाविस्कर,मनिषकुमार साळुंखे,विनायक पाटील, नितीन चौधरी,मुरलीधर बाविस्कर,सुरेंद्र सोनवणे, सोमनाथ वारूळे, प्रतीक शिरसाठ,दिलीप पाटील, यशवंत पाटील,मोतीलाल रायसिंग,मधुकर पाटील, भगवान कोळी, संजय निंबाळे, रमेश शिरसाठ, विजय पाटील, मखनलाल सैनी,एस.बी.भदाणे,दिलीप शिंदे,पी.बी.पाटील, जितेंद्र पाटील, जिजाबराव पाटील, राकेश रायसिंग, ईश्वर बोरसे, किशोर बाविस्कर, प्रवीण कोळी, विक्रम बोरसे,अरुण सपकाळे, सतिश कोळी, देवराम कोळी,महेंद्र कोळी, किसन शिरसाठ, मनोहर चौधरी,मिलिंद कोळी,एकनाथ पाटिल,भरत पाटिल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More