चहार्डी ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांचे  पगाराअभावी होत आहेत हाल#सरपंच आणि ग्रामसेवक देतात उडवाउडवीची उत्तरे – कर्मचाऱ्यांचा आरोप#गटविकास अधिकारी यांनी याप्रकरणी लक्ष घालावे हि मागणी..

चहार्डी ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांचे  पगाराअभावी होत आहेत हाल#सरपंच आणि ग्रामसेवक देतात उडवाउडवीची उत्तरे – कर्मचाऱ्यांचा आरोप#गटविकास अधिकारी यांनी याप्रकरणी लक्ष घालावे हि मागणी

चोपडा प्रतिनिधी –
       तालुक्यातील चहार्डी ग्रामपंचायतीतील स्वछता विभाग,पाणीपुरवठा विभाग व विद्युत विभागातील एकुण १४  कर्मचाऱ्यांचे सुमारे चार वर्षापासुनचे पगार थकलेले आहेत.हे पगार मिळविण्याकरीता त्यांना सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विनवण्या कराव्या लागतात.तरीही निव्वळ आश्वासन व उडवाउडवीच्या उत्तरांव्यतिरिक्त त्यांना काहीच मिळाले नाही.


       एकीकडे फ्रंटलाईन वर्करांच्या बाबतीत शासन गंभीर आहे.कारण कोरोना काळामधे त्यांनी न थांबता,थकता आपले कर्तव्य बजावले आहे.मात्र चहार्डी ग्रामपंचायतीमधील कर्मचार्यांचे जूलै २०१७ पासुनचे पगार थकीत असल्याचे तेथील कर्मचार्यांनी सांगितले.याबाबतीत मागणी केली असता सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात.व थोडीफार रक्कम अॕडव्हांस स्वरुपात देऊन तुमचा हिशोब तपासावा लागेल असे सांगितले जाते.असे कर्मचार्यांनी  बोलतांना सांगितले.तरी आमचा थकीत असलेला संपुर्ण पगार हा मिळावा अशी मागणी कर्मचार्यांनी केली आहे. याप्रसंगी लिलाबाई दिलीप चावरे,संजय पाटील,राजेंद्र पवार,करंंदिकर आदिंसह इतरही कर्मचारी उपस्थित होते

सरपंचाचा कारभार हा त्यांचे चिरंजीव निलेश पाटील हे बघतात व अक्षयतृतीया म्हणजेच आखाजीचा सण असल्यामुळे घरात काहीच नाही त्यामुळे पगाराची मागणी करण्याकरीता सर्व कर्मचारी यांनी निलेश पाटील यांना विचारणा केली मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व निघुन गेल्याचे सांगितले.
  त्यावेळी त्यांच्यासोबत गाडीमधे ग्रामविस्तार अधिकारी एस.एस.पारधी हेही होते.

———————————————————
यावेळी उपस्थित असलेल्या सफाई कामगार लिलाबाई चावरे यांनी सांगितले कि ,माझा मुलगा आजारी होता.त्याच्या उपचाराकरीता वारंवार मी माझ्या थकीत पगाराची मागणी केली.मात्र त्यांनी काहीच ऐकले नाही.शेवटी माझा मुलगा वारला.त्याच्या दशक्रिया विधीसाठी सुद्धा त्यांनी मला कुठलीच मदत केली नाही.आम्ही आमच्या हक्काचे पैसे मांगतोय.त्यामुळे ग्रामपंचायतीने आमचे संपुर्ण पगार द्यावे असे सांगितले.

**photo caption**

चोसाका संचालक  निलेश पाटील व ग्रामविस्तार अधिकारी एस.एस.पारधी यांची गाडी अडवून पगाराविषयी मागणी करतांना ग्रामपंचायत कर्मचारी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More