अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात “राष्ट्रीय डेंग्यू दिवस” साजरा.

अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात “राष्ट्रीय डेंग्यू दिवस” साजरा.
चोपडा प्रतिनिधी :—-


डेंग्यूचा ताप डासांमुळे पसरतो. एडीज इजिप्तीय या डासानं चावल्यास डेंग्यूचा व्हायरस पसरतो. पावसाळ्यात डेंग्यू अधिकच घातक होऊन जातो. डेंग्यू बद्दलची माहिती लोकांना नसल्यामुळे दरवर्षी हजारोंच्या संख्येनं लोक डेंग्यूनं आजारी होतात. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रायलानं नागरिकांमध्ये डेंग्यू आजाराबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशाने दरवर्षी
१६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.


म्हणूनच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जमादार साहेब, जिल्हा हिवताप अधिकारी-अपर्णा पाटिल मॅडम, तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदिप लासुरकर यांच्या सूचनेनुसार अडावद आरोग्य केंद्रात १६ मे या विशेष दिनाचे अवचित्य साधुन,
गावांत डेंग्यू आजाराविषयी माहिती व हस्तपत्रिका वाटुन राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. सदर
प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.विष्णु प्रसाद दायमा, डॉ.अर्चना पाटिल, समुदाय आरोग्य अधिकारी-डॉ.दिनेश चौधरी, डॉ.राहुल पाटिल,
आरोग्य सहाय्यक-प्रकाश पारधी, आरोग्य सेवक-विजय देशमुख, दिनकर वाघ, अविनाश चव्हाण, महेंद्र पाटिल, आरोग्य सेविका-चंद्रकला चव्हाण,प्रयोग शाळा वैधानिक अधिकारी-गणेश महाजन, पन्नालाल महाजन, धुडकू वारडे, बळवंत पुजारी, भुषण देवराज आदीं सर्व कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More