नवरात्रीच्या दिवसात गिरीश महाजनां महिला रणचण्डिकेचे अवतार दाखविल्या शिवाय राहणार नाहीत -राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्षा – रुपाली चाकणकर

नवरात्रीच्या दिवसात गिरीश महाजनां महिला रणचण्डिकेचे अवतार दाखविल्या शिवाय राहणार नाहीत -राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्षा – रुपाली चाकणकर


चोपडा ( प्रतिनिधी ) – संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने सताधाऱ्याची पाया खालची वाळू सरकली आहे महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे ही लाट अकार्यक्षम सरकार असल्याने होत आहे जे ग्रामपंचायतीत जे निवडून येत नाही ते मंत्री होतात यापेक्षा दुर्दैव काय पाहिजे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देतांना ते म्हणाले की, दारूच्या बाटल्यावर महिलांचे नाव देण्याचं सांगणाऱ्याना आगामी निवडणूकित आणि नवरात्रीच्या दिवसात महिला रण चण्डिकेचे अवतार दाखविल्या शिवाय राहणार नाही असा टोला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी बोलताना सांगितले
चोपडा येथील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार जगदीशचंद्र वळवी यांच्या आज दि १ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्यासाठी खास करून त्या उपस्थित होत्या अर्ज भरल्या नंतर रुपाली चाकणकराना पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले त्यावेळी त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीचा चांगलाच समाचार घेतला जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्न, शेतकऱ्याचा प्रश्न, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळाले का ?आणि पालकमंत्री जिल्ह्यात कितीवेळा आणि कुठे फिरलात ? जिल्ह्याचे समस्यांकडे दुर्लक्ष करायचे आणि भफकेगिरी करायची याला राजकारण म्हणतात का? असा सवाल ही त्यांनी यावेळी केला ईडीच्या नोटीस वरून विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, ईडीची नोटीस म्हणजे सूडबुद्धीचे राजकारण होय निवडणूक आली की शरद पवार साहेबांवर असे खोटेनाट्या कारवाया सुरू होतातच शरद पवार जर दोषी होते तर पाच वर्ष ईडी का झोपले होते का? शरद पवार साहेबांचा निवडणूकीचा दौरा सुरू होता त्यात त्यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने त्याचमुळे ईडीच्या नोटिसाचे नाटक केले महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा असा प्रकार झाला आहे या निवडणुकीत गिरीश महाजनना महिलाच घरचा रास्ता दाखवतील असेही त्यांनी बोलताना सांगितले यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, नगरपालिकेचे नगराध्यक्षा सौ मनीषा चौधरी, गटनेते जीवनभाऊ चौधरी, पिपल्स बँकचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, आदी हजर होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More