वृक्षांचे त्रिमूर्ती वड – पिंपळ – औदुंबर यांचे केली लागवड; चोपडा येथील श्रीकृष्णनगर मधील उपक्रम

वृक्षांचे त्रिमूर्ती वड – पिंपळ – औदुंबर यांचे केली लागवड
चोपडा येथील श्रीकृष्णनगर मधील उपक्रम
चोपडा प्रतिनिधी :—-


येथील श्रीकृष्णनगर मधील ओपन स्पेस मधील भागात श्रीकृष्णनगर मित्र मंडळातर्फे वृक्षांचे त्रिमूर्ती वड – पिंपळ – औदुंबराचे एकाच ठिकाणी लागवड केली आहे .वड- पिंपळ – औदुंबर हे स्वयंसिद्ध वृक्ष आहेत . सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण आणले , यमाची आराधना करून सत्यवानास जिवंत केले . पतीस दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमाला या वृक्षाची मनोभावे पूजा करतात .सतत ऑक्सिजन देणारे वृक्ष म्हणून पिंपळाचे महत्त्व आहे .

उंबराचे झाड म्हणजे औदुंबर साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराचे ख्याती आहे .जशी त्रिमूर्ती एकरूपच आहेत तसेच वृक्षांच्या त्रिमूर्तीत एक साम्य आहे म्हणजे वड – पिंपळ – उंबर या फळांची रचनाही फळात फुले अशी आहे .तीनही वृक्षांना विशेष महत्त्व असल्याकारणाने श्रीकृष्ण नगर मधील ओपन स्पेस मध्ये या वृक्षांची लागवड एकत्र करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या दारासमोर वृक्षांची लागवड देखील करण्यात आली आहे .
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक विनायक पाटील ,व्ही के पाटील , संजय जाधव , अशोक पवार , प्रविण पाटील , आर डी पाटील , प्रशांत पाटील ,समाधान पाटील , युवराज पाटील आदी उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More