ब्रेक द चैन अंतर्गत चोपडा न प ची ३७५०० रुपयांची दंडात्मक कारवाई ..

ब्रेक द चैन अंतर्गत चोपडा न प ची ३७५०० रुपयांची दंडात्मक कारवाई …
चोपडा प्रतिनिधी :—-


राज्य शासनाच्या आदेशानुसार ब्रेक द चैन मोहिमे अंतर्गत सद्यस्थितीत संपूर्ण राज्यात लॉकडाऊन असलेने कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करणेकामी दि १ जून २०२१ रोजी सकाळी ०७:०० वाजेपावेतो संपूर्ण राज्यात संचारबंदीसह विशेष निर्बंध लागू करणेत आलेले आहेत. त्याअनुषंगाने सकाळी ०७:०० ते सकाळी ११:०० या वेळेत अत्यावश्यक, मान्सूनविषयक सेवा देणारे आस्थापना तसेच सकाळी ०७:०० ते सायं. ०७:०० या वेळेत कृषी विषयक सेवा देणारे आस्थापना वगळता इतर सर्व दुकाने/आस्थापना बंद राहतील असे सुचना देणेत आलेले आहेत.


तथापि शहरातील उक्त सेवा वगळता इतर दुकाने व आस्थापना हे बंद बाबतचे पालन न करता सुरु असलेचे निदर्शनास आल्याने दि.१९ व दि. २० रोजी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांचे मार्गदर्शनाखाली चोपडा नगरपरिषदेचे दंडात्मक कारवाई करणेकामी नियुक्त पथकांव्दारे कोव्हिड-१९ नियमांचे उल्लंघन करणारे दुकाने/आस्थापना यांचेवर दंडात्मक कारवाई करणेत आली. त्यात शहरातील हरिओम खेतेश्वर, न्यु राज फुटवेअर, गोल्ड हाऊस, जितेन ज्वेलर्स, गहनाघर, आगम कलेक्शन, अंबर कलेक्शन, श्री साई कलेक्शन, दिपक जनरल स्टोअर्स, कालिका मेटल्स इ. १७ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करणेत आली असून सदर कारवाई दरम्यान एकूण.रु. ३७५०० इतका दंड वसुल करणेत आला. सदर कारवाईकामी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे व नगरपालिका प्रशासनातील इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. सदर प्रसंगी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी चोपडा शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी कोव्हिड-१९ उपाययोजना बाबतचे सर्व उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More