दररोज ५० लिटर डिझेल / पेट्रोल मोफत…. रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी रिलायन्सच्या निर्णय

दररोज ५० लिटर डिझेल / पेट्रोल मोफत…. रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी रिलायन्सच्या निर्णय….
चोपडा प्रतिनिधी :—-


कोरोना काळात रूग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी दररोज ५० लिटर डिझेल व पेट्रोल मोफत मिळणार आहे .रिलायन्स बी पी मोबिलिटी कंपनीतर्फे ही सेवा देण्यात येत आहे . चोपडा येथील चंद्रहासभाई गुजराथी यांच्या रिलायन्स पेट्रोल पंपावर ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लातूरकर व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ मनोज पाटील या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र घेऊन येणाऱ्या नोंदणीकृत खाजगी अथवा सरकारी रुग्णवाहिका व ऑक्सीजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना याचा लाभ घेता येणार असल्याची माहिती चोपडा रिलायन्स पंपचे संचालक तथा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी यांनी दिली आहे .

आज पहिल्या दिवशी चोपडा तालुक्यातील अकरा अंबुलन्स मध्ये प्रत्येकी पन्नास लिटर डिझेल टाकण्यात आले.
यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा अरुण अरुणभाई गुजराथी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुमित शिंदे , तहसीलदार अनिल गावित , तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासूरकर , उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज पाटील ,नगर परिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे ,चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पी आय अवतारसिंग चव्हाण , चहर्डी उपकेंद्राचे औषध निर्माण अधिकारी नरेंद्र चौधरी ,नगर परिषदेचे गटनेते जीवन चौधरी , राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील ,उपनगराध्यक्ष भुपेंद्र गुजराथी , नेमीचंद जैन , सुनील जैन ,सनी सचदेव प्रफुल्ल चौधरी , निपुण गुजराथी , तेज गुजराथी , साहिल गुजराथी आदी उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More