चोपडा तालुक्यात बोगस बियाण्यांची ६० पाकिटे जप्त; ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
( सदर बातमीत महालक्ष्मी बी टी बियाणे या कंपनीच्या फोटो ऐवजी चुकून बोलगार्ड (मोक्ष ) कंपनीचा फोटो वापरला गेला आहे , तरी महाराष्ट्र 9 न्युज पोर्टल तर्फे दिलगिरी व्यक्त करीत आहोत)

चोपडा तालुक्यात बोगस बियाण्यांची ६० पाकिटे जप्त; ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
( सदर बातमीत महालक्ष्मी बी टी बियाणे या कंपनीच्या फोटो ऐवजी चुकून बोलगार्ड (मोक्ष ) कंपनीचा फोटो वापरला गेला आहे , तरी महाराष्ट्र 9 न्युज पोर्टल तर्फे दिलगिरी व्यक्त करीत आहोत)

चोपडा( प्रतिनिधी):- जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून जिल्हा गुणवत्ता नियंत्रक अधिकारी अरुण तायडे यांच्या भरारी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाळकी (ता.चोपडा) येथे एका राहत्या घरी अचानक धाड टाकून शासनाची मान्यता नसलेली एचटी बीटीं बोगस कापूस बियाण्यांची ५० पाकिटे जप्त केल्याची कारवाई केली. याबाबत गुणवत्ता नियंत्रण अधिकारी तायडे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसात बोगस बियाणे विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे बोगस बियाणे विक्रेते व दलालांमध्ये खडबळ उडाली आहे.

जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर व कृषी विकास अधिकारी वैभव दत्तात्रय शिंदे यांना वाळकी (ता.चोपडा) येथे बोगस एचटी बीटी कापूस बियाणे विक्री होत असल्याची गोपनीय माहिती दूरध्वनीवरून मिळाली. त्याची दखल घेत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अरुण श्रीराम तायडे, चोपडा तालुका कृषी अधिकारी पी. व्ही. देसाई व पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी. एम. शिंपी यांच्याभरारी पथकाने संध्याकाळी दि. २१ मे रोजी शुक्रवारी वळकी
येथे पांडुरंग शामराव ढिवर यांच्या घरी अचानक धाड टाकून बोगस बियाणेची चौकशीसाठी घराची झडती घेण्याचा प्रयत्न केला. परंतू ढिवर यांची पत्नी व मुलाने घराच्या झाडाझडती घेण्यास तीव्र विरोध केला. यावेळी तायडे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक यांचेशी संपर्क करून पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, पो.ना. रितेश चौधरी, होमगार्ड रोशन बाविस्कर, प्रदीप शिरसाठ, महिला होमगार्ड रत्ना बडगुजर तात्काळ वाळकी येथे दाखल झाले यावेळी पोलीस बंदोबस्तात कृषी विभागाच्या भरारी पथकाने पांडुरंग शामराव ढिवर यांच्या घराची झडती घेतली असता घराच्या मागील बाजूस असलेल्या संडास मध्ये शासनाची मान्यता नसलेली सुमारे ६० हजार रुपये किंमतीची एचटी बीटी बोगस कापूस बियाण्यांची महालक्ष्मी नाव असलेले ५० पाकिटे पांढऱ्या प्लास्टिक गोणीत आढळून आल्याने जप्त करण्यात आली. त्यातील दोन पाकिटे नमुने म्हणून नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. बोगस बीटी कापूस बियाणे विक्री प्रकरणी गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अरुण श्रीराम तायडे यांच्या फिर्यादीवरून पांडुरंग शामराव ढिवर (वय ४५) रा.वाळकी (ता.चोपडा) यांचे विरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशनला विना परवाना बियाणेची साठवणूक व विक्री केल्यामुळे बियाणे अधिनियम १९६८ चे कलम- ७,८,९,१०, ११,१२,१३,१४ व १९६६ चे खंड ७ महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा अधिनियम २००९ व २०१० कलम१० तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चा खंड ७,८, १५ (१) (२) १६ (१) च्या तरतुदींचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे करीत आहेत.

  • डी. एम. शिंपी, कृषी अधिकारी पंचायत समिती, चोपडा.

गुजरात, मध्यप्रदेश राज्यातील बोगस एचटीबीटी कापूस बियाणेची विक्री होत आहे. शेतकऱ्यांना बियाणे घेतल्याचे पक्के बिल मिळत नाही. बिल नसल्याने शेतकरी कृषि विभागाकडे तक्रार करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पश्चाताप करणे शिवाय पर्याय नाही. कोणत्याही अनोळखी व्यक्ती कडून बियाणे विकत घेऊ नका, बियाणे विक्रेता किंवा दलाल बोगस एचटीबीटी कापूस बियाणे, खते व कीटकनाशके विक्री करीत असल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस किंवा कृषी विभागास द्यावी. संबंधिताचे नाव गुप्त ठेवण्यात येईल कापूस पिकावरील गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनमान्य बीटी कापसाची लागवड दि. १ जून नंतरच करावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More