अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाही होतोय नाहक त्रास ?अडावद पोलिसांनी केली मुख्याध्यापकांवर दंडात्मक कारवाई !…

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाही होतोय नाहक त्रास ?
अडावद पोलिसांनी केली मुख्याध्यापकांवर दंडात्मक कारवाई !…

चोपडा प्रतिनिधी :—
कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाचा विचार करता दिनांक १ जून सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाउन व कडक निर्बंध लागू केले आहेत . सकाळी सात ते दुपारी अकरा पर्यंत अत्यावश्यक सेवा देणारे आस्थापने सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत . दुपारी अकरानंतर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे पण यातून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळण्यात यावे असे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे .


ए व्हा मिशन शाळा धानोरा येथील मुख्याध्यापक तुकाराम उमराव महाजन हे विद्यालयात शालेय पोषण आहार वाटप करण्यासाठी गेले असता अडावद पोलिसांनी त्यांना रस्त्यावर थांबवून त्यांचे काहीही ऐकून न घेता लॉकडाऊन चे नियम मोडल्याप्रकरणी दोनशे रुपयाची दंडात्मक कारवाई केली आहे व त्यांच्या मोटर सायकलची चावी देखील काढून घेतली असल्याचे महाजन यांनी सांगितले .

कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना मी हात जोडून विनंती करत होतो की, मी मुख्याध्यापक आहे ,शाळेवर गेलो होतो , माझ्याकडे ओळखपत्र पण आहे पण साधे ओळखपत्र पाहण्याची इच्छा सुद्धा पोलिसांनी दाखवली नसल्याचे महाजन यांनी सांगितले आहे .तुमच्यासारखे दिवसभर असे भरपूर भेटतात असे पोलिसांनी म्हटले . तरी शिक्षक , मुख्याध्यापक ,ग्रामसेवक ,तलाठी , डॉक्टर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्याच्या गावी जाताना त्रास होत असल्याचे महाजन यांनी सांगितले. १४४ कलम लागू असताना पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई पोलीस यंत्रणेमार्फत केला जात आहे पण पोलीस मात्र वीस-पंचवीसच्या जथ्याने एकत्र थांबून कारवाई करताना दिसत आहेत हे कोणत्या नियमात आहे असा प्रश्‍न महाजन यांनी उपस्थित केला आहे तरी पोलिस प्रशासनाने नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे त्यानंतरच कारवाई करावी असेही त्यांनी सुचवले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More