चोपडा शहरात अवैध वास्तव्य करणार्‍या बांग्लादेशी,रोहिंग्या नागरिकांना अटक करावी..

चोपडा शहरात अवैध वास्तव्य करणार्‍या बांग्लादेशी,रोहिंग्या नागरिकांना अटक करावी..
भारतीय जनता पार्टी चोपडा..


चोपडा शहरात गेल्या अनेक दिवसापासुन बांग्लादेशी,रोहिग्या नागरिकांनी अवैधरित्या वास्तव्य सुरु केले आहे,शहरातील धनवाडी रस्ता,म.गांधी महाविद्यालय,नारायणवाडी परिसरामागे तसेच डाक बंगल्याच्या बाजूला आदि ठिकाणी असे बांग्लादेशी अनोळखी नागरिक आपल्या कुटुंबासह वास्तव करीत आहेत ते दिवसा बाजारात,तसेच शहरातील काॅलनी परिसरात तोंडाला रुमाल ,मास्क न लावता भिक मागण्याच्या बहाण्याने फिरतात त्यामुळे संसर्ग व रात्री चोरीच्या बेतात फिरतात.


अशा अवैध नागरिकांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी चोपडा तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांकडून चोपडा शहर पोलिस निरीक्षक यांना दि.24/5/2021 सोमवार रोजी लेखी निवेदन देवून करण्यात आली..
निवेदनावर-
तालुकाध्यक्ष पंकज सुभाष पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल ,जिल्हा चिटणीस सौ.रंजनाताई नेवे,मा.शहराध्यक्ष रवींद्र बडगुजर व्यापारी आघाडीचे ज्ञानेश्वर पाटील,उपाध्यक्ष हेमंत जोहरी,अल्पसंख्याक मोर्चाचे संजय श्रावगी,शहर सरचिटणीस सुनिल सोनगिरे,शहर उपाध्यक्ष जीवन पाटील,प्रविण चौधरी,ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष मंगल गुजर,कार्यालयप्रमुख मोहित भावे..आदिच्या स्वाक्षर्‍या आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More