चोपड्यात पत्त्यांच्या जुगारावर धाड .., एक लाखाच्या मुद्देमाल हस्तगत..
चोपडा शहर पोलिसांची कारवाई
चोपडा प्रतिनिधी :—-

चोपडा शहर व तालुक्यात जुगार अड्ड्यांवर धाडसत्र सुरूच आहे . शहर पोलिस स्टेशनचे पी आय अवतारसिंग चव्हाण यांना गुप्त खबर मिळाली होती की , शहरातील भोकरवाडा भागात शब्बीर अली निसारअली यांचे घराजवळ पत्री शेडच्या आडोशाला काही लोक बावन्न पत्त्यांच्या कॅटवर पत्ता जुगाराच्या खेळ खेळत आहेत तरी खात्री करणेकामी व धाड टाकणेकामी शहर पोलीस स्टेशनला उपस्थित पोलीस कर्मचारी विलेश सोनवणे , ज्ञानेश्वर जवागे , शेषराव तोरे , संदीप भोई , सुभाष सपकाळ , विजय बच्छाव ,मिलिंद सपकाळे व आत्माराम अहिरे इत्यादी शासकीय वाहन व खासगी वाहनाने गेले असता व खात्री केली असता पत्र्याच्या शेडच्या आडोशाला काही इसम तोंडाला मास्क न लावता व सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता पत्ते खेळत असल्याचे निदर्शनास आले .

सदर व्यक्तींवर पोलिसांनी धाड टाकली असता त्यात सलीमअली शब्बीरअली सय्यद ( वय 33 ) , भगवान चैत्राम भोई ( वय 29 ) , गोविंदा रमेश भाट (41) , शेख शाहिद शेख सिकंदर ( 52) , अफसर जईरअली सय्यद (34 ) , जाहिद अली जहूर अली सय्यद ( 40) , राकेश उर्फ भोला दीपक शिंपी( 25) , प्रवीण पितांबर धोबी 42) इत्यादी रंगेहात पकडण्यात आले तसेच छापा टाकल्या वेळी पळून जाण्यात युसुफ अली शब्बीर अली सय्यद , अजहर अली पूर्ण नाव माहीत नाही , पिंटू पूर्ण नाव माहीत नाही हे तीन इसम पळून जाण्यात यशस्वी झाले .

ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ९८१० रुपये रोख , ६० हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली , 32 हजार रुपये किमतीचे मोबाईल हँडसेट असा एकूण एक लाख एक हजार आठशे दहा रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे .सर्व आरोपींविरुद्ध मुंबई पोलीसऍक्ट कलम १२ (अ ) भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या पुढील तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना शेषराव तोरे करीत आहेत…













