चोपडा तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीवर पंचायत समितीचे माजी उपसभापती एम व्ही पाटील

चोपडा तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीवर पंचायत समितीचे माजी उपसभापती एम व्ही पाटील यांची निवड चोपडा प्रतिनिधी :—


चोपडा तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली असून त्यासंबंधीचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सहीचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे . ना गुलाबराव पाटील मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई तथा पालकमंत्री जळगाव यांच्याकडून सदस्यांची शिफारस यादी नुसार चोपडा तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीवर पंचायत समितीचे माजी उपसभापती एम व्ही पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे .


सदर समितीच्या अध्यक्षपदी चोपडा विधानसभेच्या विद्यमान आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे तसेच सहअध्यक्ष म्हणून चोपडा पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा बापूराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
सदर समितीवर सदस्य म्हणून एम व्ही पाटील ( माजी उपसभापती प स चोपडा ) , शिवराज संभाजी पाटील ( सनपुले ) , ज्ञानेश्वर तुकाराम आहिरे ( हातेड ) ,दीपकसिंग गणेशसिंग जोहरी (अरुण नगर) , कैलास राजाराम बाविस्कर (लासूर ) ,ताराबाई दिलीप पाटील ( थाळनेर दरवाजा ) पुष्पा सुनील जैन (मेन रोड ) , शोभाबाई सदाशिव देशमुख (पाटीलगढी ) यांची निवड करण्यात आली आहे.
सदर निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More