चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचे धुमशान, अनेक घरांचे पत्रे उडाले, सुदैवाने जिवीतहानी नाही
चोपडा प्रतिनिधी :—-

चोपडा तालुक्यातील काही भागात शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार धुमशान घातले .त्यात अनेक घरांचे पत्रे उडाली असून ,काही ठिकाणी वृक्ष जमीनदोस्त झाली आहेत मात्र सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नसल्याचे कळते.
वादळी वाऱ्यामुळे चोपडा तालुक्यातील वेले गावात सुमारे पंचवीस ते तीस वृक्ष कोलमडले असून , महावितरणची विजेची तारे अनेक ठिकाणी तुटल्याचे दिसून आले आहे तसेच ग्रामपंचायतीच्या सौर ऊर्जेचे सहा पोल देखील जमीनदोस्त झाले आहेत त्यामुळे गावात वीज नसून गावकऱ्यांना रात्र अंधारातच काढावी लागणार आहे .

झालेल्या नुकसानीत बुधा आत्माराम पाटील यांच्या गोठ्यातील एक लाख रुपयाचा चाऱ्याचे नुकसान झाले आहे , सकवारबाई विनायक पाटील यांच्या घराचे पत्रे उडाली असून संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे खटाबाई शिवराम भिल्ल यांचे घर पूर्णता नेस्तनाबूत झाले असून दोन कोंबड्या मेल्या आहेत तर बकरी जखमी झाले आहे ,गुलाब सदाशिव कुवर यांची सलून व्यवसायाची टपरी उडाली आहे , सुनील हिंमत पाटील यांची वीस क्विंटल दादर वादळी वाऱ्याचा पावसाने ओली झाली आहे , पांडुरंग उदा गुजर यांच्या गोठ्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे , मधुकर पंडित पाटील यांचे उन्हाळी मुगाचे नुकसान झाले आहे तसेच बाबुराव गुलाब भिल्ल यांच्या सुमारे दहा क्विंटल कैद्यांचे नुकसान झाले आहे तर याशिवाय चोपडा शहरातील नागलवाडी भागातील घराच्या पत्रा उडून घराचे नुकसान झाल्याचे कळते .

अचानक आलेल्या वादळी वारा व पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी चोपडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी एस कोसोदे यांनी वेले यागावी तात्काळ भेट दिली तसेच तहसीलदार अनिल गावित यांनी तलाठ्यांना पंचनाम्याचे तात्काळ आदेश दिले आहेत तसेच वेले येथील उपसरपंच दीपक पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांना झालेल्या नुकसानीची माहिती भ्रमणध्वनीवरून दिली आहे ..













