नरवाडे येथे आहील्यादेवी होळकर जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबीर*

वर्डी ता चोपडा( वार्ताहर) येथुन जवळच असलेले नरवाडे तालुका चोपडा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिराचे १ जून २०२१ रोजी आयोजन करण्यात आले होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या सामाजिक कार्याला मानवंदना म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. चुनिलाल भिलाला यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. चुनिलाल भिलाला यांनी कोरोना काळात केलेल्या सेवेबद्दल त्यांना हा मान देण्यात आला.

उद्घघाटना प्रसंगी वेळी गावाचे सरपंच,पोलिस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. झाड लावून या कार्यक्रमाचे उ्घाटन करण्यात आले. तसेच गावातील कोरोना योध्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी जळगाव येथील “माधवराव गोडवलकर स्वयंसेवी रक्तपेढी चे जनसंपर्क अधिकारी अर्जुन राठोड व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
या प्रसंगी नंदलाल चौधरी सर, अविनाश धनगर , धिरेंद्र शिरसाठ , दिनेश न्हायदे , महेंद्र धनगर, निखिल सावळे, समाधान माळी, राकेश धनगर, आनंद धनगर, अमोल धनगर, लिलाधर धनगर, प्रणव धनगर, योगेंद्र धनगर इत्यादी रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाला नरवाडे ग्रामस्थांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
(नरवाडे ता चोपडा येथे रक्तदान करणारे दात्यांना प्रमाणपत्र देताना)













